नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 8, 2021

प्रेम बंधन भाग - 3

नित्याने फ्रेंड रिक्वेस्ट तर पाठवली होती ..
रिप्लाय yes येईल ह्याची जराही गॅरंटी नव्हती .मनात खूप प्रश्न येत होते . त्याने जर रिप्लायच नाही दिला तर , किंवा मी अस कोणाशीही मैत्री नाही करत असं बोलला  , तर केवढा मोठा अपमान होईल आपला असं म्हणत ती स्वतःच स्वतःवर हसत होती .

आता जाऊ दे होईल ते होईल असं म्हणत काहीतरी tyipe करायला लागली ...

नाते विसावले नव्या वळणावर ,
क्षण भर का होईना मी प्रेम केले ,
ह्या जन्मावर , ह्या जगण्यावर ..
माझ्या अस्तित्वावर , माझ्या श्वासावर ,
माझ्या कलेवर , माझ्या लिखाणावर ...
क्षणभर का होईना मी प्रेम केले ..
माझ्या मनाच्या गाभाऱ्यावर ...
माझ्याच माझ्या अस्तित्वावर .....

ह्या काव्यरचनेला तिला एवढी सुंदर कॉमेंट आली . तीही r . पाटील ची ती खूपच खुश झाली ...आणि इनबॉक्स मध्ये मेसेज ही आला ...

Wel come welcome 💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
नक्की आवडेल मला हे मैत्रीचं पवित्र बंधन ..🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

ती खूप खूष झाली ...तिने फक्त thanks म्हणून रिप्लाय दिला ....आणि ऑफलाईन जाऊन परत काही तरी tyipe करायला लागली ...

मिळाला हात नवा मैत्रीचा ,
अनुभव तो नव्या मित्राचा ..
छानच ठरला क्षण तो आजचा 
ज्याने ठावच घेतला मनाचा ....

आणि ती कविता पोस्ट करते ....

तो ही एक पोस्ट शेअर करतो .....
अनोळखी लोकांना ही आकर्षण वाटावं असं व्यक्तिमत्व असावं , तरच तो आदर्श व्यक्ती म्हणून  गणल्या जावू शकतो ..

ते एकमेकांच्या पोस्टला कॉमेंट करतात .....
पण इनबॉक्स मध्ये जायला कोणीही पुढाकार घेत . नव्हते .

शेवटी ते परत tyipe करायला लागले ...

नित्या - 
 असे कसे हे मन ,
किती अनोखे देते क्षण ...

मनास वाटते जे करावेसे का नाही वाटत ,
मनात असंख्य विचारांचं उगाच चक्र दाटत ...

का असे होते मन माझे मलाच छळते ,
माझ्या स्वतःवर च ताबा दाखवते ...

मन आहे ते असेच असते सावरून पुढे जायचे असते .
अतिशय सुरेख रचना केली 👌👌👌👌💐💐💐
अशी कॉमेंट तिला राहुलची येते ...

ती खुश होऊन त्याला रिटर्न रिप्लाय देते ...
थॅन्क्स पण मनाला थोड तरी समजायला हवं .मनासारखं वागू द्यायला हवं की नको ? 
परत तिला रिप्लाय येतो ...

त्याने कुठे अडवल आपण स्वतः च स्वतःला अडवत असतो . जे वाटतं ते करायचं कसलंच टेन्शन नाही घ्यायचं मनाला जे वाटेल , तस वाटेल तेच करायचं . मन मारून नाही तर , मनभरुन जगायचं ..😊😊😊😊

नित्या - tnx ह्या सुंदर विचारासाठी ...
 आणि सुंदर कॉमेंट साठी 😊😊😊🌹🌹🌹🌹

त्याच्या पोस्ट ला ती कॉमेंट करते ...
करेक्ट आहे व्यक्ती महत्त्व समोरच्यावर इम्प्रेशन पडेल असच हवं ....😊😊😊👌👌👌👍👍👍

राहुल रिप्लाय - thankyou so much from bottom of my hurt 🙏🙏🙏😊😊😊❣️❣️

परत राहुल एक पोस्ट शेअर करतो ....

ज्या दिवशी आपल्याकडे वेळ असतो , ना तेव्हाच नेमका आपल्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो ...आपल्याला जेव्हा एखाद्याशी बोलावंस वाटतं तेव्हा बोलण्यासाठी ही कोणी नसतं ...😔😔😔

नित्या रिप्लाय - करेक्ट आहे असा अनुभव अनेकदा मलाही आलेला आहे ...but bee happy work is important also 😊😊😊

आणि मग नित्याच पुढाकार घेऊन इनबॉक्सला मेसेज टाकते ...काय आज बोर झालास बोलायला कोणी नाही का ? 
माझी कंपनी आवडेल का ? 
धाकधूक मनात रिप्लाय येईल की नाही ह्याचा , पण आला रिप्लाय 

" हो आवडेल म्हणजे खूपच जास्त आवडेल .." 

ते एकमेकांच्या फॅमिली बद्दल जाणून घेतात . राहायला कुठे वैगरे वैगरे ...बऱ्यापैकी आता त्यांची चांगलीच ओळख झाली होती .. तेवढ्यात राहुल ला कॉल येतो ...आणि तो unconect होतो ..त्याचा रिप्लाय न आलेला पाहून ती पण ऑफलाईन जाते .

दुसऱ्या दिवशी पर त तोच खेळ लपाछपीचा ....
पण नित्या आज डायरेक्ट मेसेज करते . आज मी फ्री आहे खूप वेळ तू आहेस का फ्री ? तो नाही मी आज पूर्ण दिवसभर bussy आहे ...तू कर एन्जॉय ...

ती ओके म्हणते आणि तीच तीच लिखाण काम सुरू करते ....

 वक्त भी क्या होता है ।
जब हमारे पास होता है ।।
तब दिल से कोई अपना याद आता है ।
जो दिल से याद आता है ।।
वो ही सबसे ज्यादा bussy हो जाता है ।।
बाते हो नहीं पाती ।।
सांसे मै खोना नहीं चाहती ।।
उसके यादों में , मै खोना नहीं जानती ।
सिर्फ दिल से हर पल याद करना जानती हूं ।।
 
ही कविता ती पोस्ट करते ..लिखाण होईपर्यंत डाटा ऑफ असतो ..pablish करायच्या वेळेसच ऑन असतो  .  तिला notification येतं . राहुलच्या पोस्ट चं 
मनात प्रश्न ही येतो . हा तर bussy होता मग ह्याने पोस्ट कशा शेअर केल्या ..? 
मिळाला असेल थोडा कामातून वेळ असं म्हणत तिने इग्नोर केलं ....त्याची पोस्ट वाचे पर्यंत तिला notification आलं ..तिने पोस्ट केलेल्या कवितेला राहुल ची कॉमेंट  येते . ती परत विचार करू लागली . ह्याला कामं आहे तरी हा वाचत कस काय आहे ? 

ती परत त्याच्या इनबॉक्स ला मेसेज करते . मला खूप वेळ आहे पण तुला वेळ नाही तर बाय काळजी घे . 

त्याचा तिला फक्त एवढाच रिप्लाय येतो " हो ना " 🙏🙏🙏🙏🙏🙏

ती परत तिचं तिचं tyipe करते ..त्याचा विचार काढून टाकते . Tyipe करते पोस्ट करते . तिने जे जे tyipe केलेलं त्या प्रत्येक पोस्ट ला राहुलची कॉमेंट होती . तिला आश्चर्य वाटलं . त्याने भरुपुर पोस्ट शेअर केल्या होत्या . तिने पण त्याला कॉमेंट केली होती . त्यात एक पोस्ट अशी होती . जणू ती त्याने हिला torcher करण्याच्या हेतूने पोस्ट केलेली असावी ...

आजकाल ह्या प्रतीलिपिवर् सुरुवातीला तुम्ही खूप छान लिहिता . Nice jok करता . आधी कॉमेंट आणि नंतर डा यरेक्ट इनबॉक्स ला मेसेज एकावर एक चालूच ठेवता  ... काही कामं नसता का लोकांना ...त्यानंतर ही पण त्याच्यावर कॉमेंट करते . 
काय माहित असं माझ्याही बाबतीत घडत द्यावा वाटला रिप्लाय तर द्यायचा नाहीतर सोडून द्यायचं . लोकं काही फोर्स करत नाही आपल्याला रिप्लाय द्याच म्हणून ...
तो नीत्याला रिटर्न कॉमेंट करतो ...
आता लोकांनी हाच उद्योग सुरू केला असेल तर , मग आपल्याला इग्नोर च करावं लागेल . 

त्याच्यानंतर ही दिवसभर त्यांचं पोस्ट शेअर करन एकमेकांना रिप्लाय देणं सुरूच होत . 

नात्याला खूपच वाईट वाटल होतं . ह्याला बोलायचं नव्हतं तर , तस डायरेक्ट सांगायचं ना मी काय बोल बोल म्हणून फोर्स करणार होते का ?  
मी उगाच ह्याला भाव दिला . किती इगो आहे ह्याला केवढा हा attitude ...शी आता बोलायचं नाही . का उगाच स्वतःच अपमान करून घ्यायचा , स्वतःच्याच नजरेत कमी व्हायचं ...

काय वाटतं तुम्हाला नित्या बोलेन का परत राहुलशी की राहुल स्वतःच मेसेज करेन . नक्की काय होईल आहात ना उत्सुक मी पण आहे ते बघुया पुढच्या भागात ..






No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...