नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 8, 2021

काय माहित काय नातं आहे

तो म्हणजे आयुष्यातील सुंदर पहाट ,
माझ्या सोनेरी आयुष्याची सुरुवात ,

रोज रोज गप्पा भारी मारतो ,
असं ना तसं रोजचं छळतो ,

न मागताच रोज सरप्राइज देतो ,
 सारखा सारखाअबोला धरून माझा जीव घेतो ,

मी तुला कितीही त्रास दिला ,
तरी माझ्या प्रत्येक मेसेज ला तुला रिप्लाय द्यावाच लागेल ,
हक्काने सांगतो ,
हे बोलणारा तू कोण ? 
असं विचारल्यावर नुसतच ईमोजिस पाठवतो ,
आणि गोंधळात मला पाडतो ,

आपल्या नात्याला नाव देण्याची काय गरज ,
कनेक्शन आहे ना ते नाही का महत्वाचं , 
असं बोलून नेहमी गप्प करतो ...

त्यांचं माझं नातं काय अजुनही कळलं नाही ,
पण नक्कीच काहीतरी आहे म्हणून तर ,
नेहमीच एकमेकांच्या कल्पनेत नेहमीच प्रगट होतं असतो .

काल्पनिक रचना ह्याची नोंद घ्यावी .

4 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम romantic नात सांगितल सगळे चित्र उभे राहिले क्या बात है सुंदर

    ReplyDelete
  2. मस्त एकदम 👍

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. मस्तच...✍️👍👌🍫🌹

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...