आज काहीतरी बिघडले होते ,
आईला उपवास होता ,
जेवायला आम्ही दोघेच होतो ,
त्यामुळे बाबा माझे खूप कौतुक करत होते ,
मी जेवायची बाकी होते ,
आज जेवायचं नाही का सतत बाबा विचारत होते ,
नसेल जेवायचं तर नको जेऊ ,
भाजी दे टाकून सतत सांगत होते ,
मला तर काहीच कळत नव्हते ,
नक्की माझे काहीतरी चुकले होते ,
ताटात भाजी घेतली ,
घास तोंडात टाकला ,
मीठ गरजेपेक्षा जास्त झाले होते ,
तरीही बाबा मटक्या मटक्या मारत मारत खात होते ,
कौतुकाचे पाढे गिरवत होते ,
नजरेने त्याने मला खुणावले ,
भाजीचा बेत फसला चिमणे .....
आज नव्हते ऐकायचे टोमणे ,
म्हणून कौतुकाचे पाढे गिरवले .....
वाह खुप छान, बाबा असताच असे👍😊🙏👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete