माझ्या सोनेरी आयुष्याची सुरुवात ,
रोज रोज गप्पा भारी मारतो ,
असं ना तसं रोजचं छळतो ,
न मागताच रोज सरप्राइज देतो ,
सारखा सारखाअबोला धरून माझा जीव घेतो ,
मी तुला कितीही त्रास दिला ,
तरी माझ्या प्रत्येक मेसेज ला तुला रिप्लाय द्यावाच लागेल ,
हक्काने सांगतो ,
हे बोलणारा तू कोण ?
असं विचारल्यावर नुसतच ईमोजिस पाठवतो ,
आणि गोंधळात मला पाडतो ,
आपल्या नात्याला नाव देण्याची काय गरज ,
कनेक्शन आहे ना ते नाही का महत्वाचं ,
असं बोलून नेहमी गप्प करतो ...
त्यांचं माझं नातं काय अजुनही कळलं नाही ,
पण नक्कीच काहीतरी आहे म्हणून तर ,
नेहमीच एकमेकांच्या कल्पनेत नेहमीच प्रगट होतं असतो .
काल्पनिक रचना ह्याची नोंद घ्यावी .
खूपच सुंदर अप्रतिम romantic नात सांगितल सगळे चित्र उभे राहिले क्या बात है सुंदर
ReplyDeleteमस्त एकदम 👍
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteमस्तच...✍️👍👌🍫🌹
ReplyDelete