" सुधा अग प्लीज लग्न कर ..अशी एकटीने संपूर्ण आयुष्य नको राहू ...एकट्या बाईचं जगात वापर न खूप अवघड असतं..त्यात तू तरुण ..तुझ्या सोबत जे घडल ते वाईटच ..ते कुणाही सोबत घडू नये . हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
प्लीज बाई तू लग्न करून घे ...ऐक माझ .."
सुधा ची आई तिला समजावत होती. आणि सुधा मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती ...काहीही झालं तरी तिला आता दुसरं लग्न करायचं नव्हत. संपूर्ण आयुष्य एकटीने जगायचं ..असा मनी कयास च तिने बांधला होता ..
" आई ...दुसर लग्न करू आणि पुन्हा एकटं राहू ...तुला ही माहीत आहे ..चांगलं मला माझ्या नवऱ्याने का सोडलं ते ...."
एवढं बोलून सुधा भरल्या डोळ्यांनी आपल्या आई कडे बघू लागली ...आईची नजर ती बोलल्या वर आपसूकच खाली गेली .....
आणि त्यांनी ही त्यांच्या डोळ्यांतील आसवांना वाट मोकळी करून दिली....
" आई प्लीज नको रडू अशी ....मी कधीही आई होऊ शकणार नाही ...म्हणूनच हर्ष वर्धन नी मला सोडून दिलं ना ...मग आता कशा वरुन मला दुसरा एखादा पुरुष स्वीकारेल ...? "
तिला खूप त्रास होत होता. बोलताना पण तरीही ती बोलत होती . कारण तिला माहीत होतं ...आपण आयुष्य भर एकटे तर राहणार आहोत . पण त्या एकट्या पणा सोबत हा त्रास ही राहणार होता ..
आई काहीच न बोलता आत निघून गेल्या ... आणि सुधा ने आज नव्याने तिचा एकटेपणा स्विकारलारला तो ही आयुष्यभरासाठी ...
No comments:
Post a Comment
Comments plz.