नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 28, 2023

कनेराचे फुल

कोणाला गुलाबाच फुल आवडत तर कोणाला जाई - जुईच् पण,
मला आवडत ते कनेराचे फुल ...
जरा जगावेगळी चॉईस आहे माझी पण काय करणार कनेराच्या
फुलाला  कोनीच् आपल मानत नाही . आणि मि सगळेजण करतात तसा अन्याय त्याच्यावर् करू शकत नाही . आता तुम्ही विचारालं फुलावरही कोणी अन्याय करत का ? तर मि सांगेन हो
फुलांवरही अन्याय होतो , मि स्वतः हा पाहीलंय् फुलांवर अन्याय. होताना  सर्वच् फुलांवर नाही होत पण बीचाऱ्या कनेरावर् मात्र नक्कीच् होतो .
शहरी भागात नसेल होत कनेरावर् अन्याय , कधाचीत् कनेराची गोष्ट च् माहित नसेल , पण मि खेड्यात राहते त्यामुळे माझा  कनेराशी संबध् आला आणि त्याची गोष्ट कळाली ........
माणसं माणसावर् अन्याय करतात हि तर मनात खंत आहेच् पण याहून मोठी खंत आहे  ति माणसाने निसर्गालाही नाही सोडलं या गोष्टीची .
माझ्या गावांत एक जागृत देवस्थान् आहे , त्यामुळे  रोज सकाळी लवकर उठायच् , बागेत जाऊन फुल आनायचे आणि देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे हे आम्हा मैत्रीनीच्  ठरलेल
रुटीन आहे . ह्यात कधीच बदल नाही झाला कितीही. कामं असो आम्हचा नियम म्हणजे नियम् आहे . आम्ही मैत्रीनी सोबत जायचो , सोबत यायचो .पण आज मला जरा जास्तच उशीर झाला . मैत्रीनीही मला एकटीला मागे सोडून निघून गेल्या होत्या
मग काय मि एकटीच बागेत गेले , दररोजच्या सारखे आज तिथे फुलच् नव्हते . मात्र बघताक्षणी लक्ष वेधून घेणार एक फुलपाखरु मला दिसलं . काळ्या रंगाची बॉर्डर असलेलं ते फुलपाखरु  , छटा हि लाल पांढऱ्या रंगांच्या अगदी काळ्या बॉर्डरला शोभेल अशा , त्याच ते रूप बघून मि त्याच्याकडे एकटक् बघतच्  राहिले . नकळत त्याच्याजवळ गेले अन माझ्याकडून ते ज्या फुलझाडावर बसलेल् होत .ते झाडच् हाल्ल् आणि ते उडायला लागल् , मि हि त्याच्या मागे धावू लागले , खूप दुरवर् धावत गेले अगदी बागेच्या शेवटच्या टोकापर्यंत तिथेही डोळे दिपतील् असं निसर्गसौंदर्य बघायला मिळाल् जे आजपर्यँत मि  नव्हतं पाहिलं . उग्र वासाची घाणेरीची फुल तर होतीच् , पण त्याचबरोबर् होती ती मंद गुलाबी रंगाची कनेराची फुल त्याच्या सुंगधाने तर मनाला साद घातलीच् होती , पण रुपही मनाला मोहवनारच्  होत . ती फुल पाहून मि खूप खुश झाले . कारण आज वेगळया प्रकारची फुल मि मंदिरात घेऊन जाणार होते .
जे आजपर्यँत कोनीहि नेले नव्हते .
जवळ असलेल्या पारडीत् मि सारी फुल तोडून् ठेवली आणि घाई - घाईने मंदिराच्या दिशेने निघाले , तिथे गेल्यानंतर स्वप्नांतही विचार नव्हता केला असा प्रकार घडला . मि पूजा केल्यानंतर देवी समोर फुल ठेवणारच् तर ,  ती फुलाची पारडी एका बाईने
घेतली आणि ती कनेराची सारी फुल मंदिरापासुन् खूप दुरवर् असलेल्या कचऱ्याच्या पेटीत नेऊन टाकली . मला त्या बाईचा खूप राग आला , पण मि काहीच नाही बोलू शकले कारण ती गावातील् सर्वात वृद्ध स्त्री होती , शिवाय तिच्या अंगात देवी येते असंही म्हणतात . म्हणून मि काहीच न् विचारता तिनेच् , सांगीतल .
             तु आज कनेराची फुल आणली हरकत नाही , पण
यानंतर हि फुल मंदिरात तर आणूच् नको पण तूझ्या घरातील्
देवाऱ्यात् हि नको ठेवत जाऊ हि फुल भूत- प्रेत काढण्यासाठी
करणी करण्यासाठी वापरतात् त्यामुळे ती फुल कोणत्याच् देवाला चालत नाही . त्या बाईच् हे बोलणं मला विचित्र् वाटलं
हास्यास्पद वाटलं ,  देवाला फुल चालत नाही असंही कुठे असत का ? पण वाद न् घालता तिथून पळ काढन् मला योग्य वाटलं .
कारण आधीच् खूप उशीर झालेला आणि सोबतही कोणीच् नव्हतं .  म्हणून मि त्या बाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि
घरी निघून आले .
पारडीत् असणारी सारी फुल त्या बाईने फेकली खरी पण कसं काय त्या पारडीत् एक फुल अडकून राहील् होत . ते फुल मि घरी आल्यानंतर बघीतल  , आणि दिवसमोर् ठेवलं  . त्या फुलाचा सुंगध घरभर् पसरला होता , त्याच्या सुंगधाने प्रसन्न वाटत होत .
अरे व्वा ! केवढा सुंदर  सुंगध येतोय आज कोणती अगरबत्ती लावली देवासमोर असं म्हणतं म्हणतं माने काकु आम्हच्या घरी आल्या आणि त्यांनी हे कनेराच् फुल बघून डोक्याला च् हात लावला . आणि म्हणाल्या  अग हे फुल का  आणलं ? आणि आणलं तर आणलं पण देवासमोर का ठेवलं .अस म्हनतच देवाऱ्यातल्  फुल उचलुन् बाजूला टाकलं . त्याचा तो  प्रश्न ऐकून मि तर चक्रावलेच् होते . मंदिरातही ती बाई तेच बोलली आणि आता माने काकू हि तेच बोलत होत्या . आता मात्र मला शहानिशा करायची होती . नेमक कनेराचे फुल देवासमोर् ठेवल्याने काय होत ? मि माने काकूना विचारलं काय हो काकू
काय फरक पडतो कनेराच फुल देवासमोर् ठेवल्याने . काय कमी आहे त्या फुलामध्ये अबोलीलाही लाजवेल् असा त्याचा रंग
आहे , मनमोहक् असा त्याचा सुंगध हे मग का ते देवाला चालत नाही . तर त्यावर त्या म्हणाल्या हे फुल करणी करण्यासाठी , भूत काढण्यासाठी ह्याचा वापर करतात ,  म्हणून ते देवाला चालत नाही .
मला तरीही ते पटत नव्हतं , मि त्यांना म्हणाले ज्याचा उपयोग् भूत प्रेत काढण्यासाठी होतो , त्याचा देवाला विटाळ कसा असेन ? उलट जे फुल वाईट गोष्टीचा  नायनाट करतो ते फुल
देवाला सर्वात प्रिय असायला हवं नाही का ? त्यावर त्या म्हणाल्या , " करणी करण तर वाईट च् आहे ना , लोकांच् आयुष्य बरबाद होत कोणी करणी केली तर "  आता माझ्याकडे
बोलायला शब्द नव्हते ,  पण तरीही मि  समजावण्याचा प्रयत्न केला यात फुलाची काय चुक ? फुल म्हणतं का मानसाला माझा
वापर करणी करण्यासाठी कर , लोकांच् वाईट करण्यासाठी कर
त्याला तर माहीतहि नसतं आपण नेमकं कुठे आहोत् , रस्त्याच्या
कडेला कि देवाऱ्यासमोर् लोकांनी जे स्थान दिल ते तो स्थान स्वीकारतो . हे ऐकल्यानंतर माने काकूही गप्प होतात . पण तरीही त्या पुन्हां म्हणाल्याच् तुझं म्हणणं काही मला पटत नाही .
मग  मिही त्याच्यासमोरच ते फुल घेतल् आणि पुन्हां देवाऱ्यात् ठेवल् .  आणि म्हणाले  बघा काकू देवाने तर फुल झीडकारल् नाही , स्वीकारलच् . उलट ह्या फुलाने माझं देवघर् अजून छान दिसतंय . त्या ह्यावर् काहीच नाही बोलल्या , मनाशीच पुटपुटल्या अशा आगाउच्या कोण नादी लागेल . आणि निघून गेल्या .
मि जे सांगत् होते ते अजूनही नव्हतं पटलं त्यांना .
खरं सांगायच झालं तर् विक्षीप्त् माणसाची विचारशैली आहे ,  कनेराच फुल नाही . मि कनेराचा स्वीकार केलाय आणि मला वाटतं देवानेही केला .मला एक कळत नाही
निसर्गातील्  प्रत्येक गोष्टीची निर्मिती देवाने केलीय मग देवच् त्याचा विटाळ कसा करेल ?

       हि स्टोरी पूर्णतः काल्पनिक आहे पण अशा अंधश्रद्धा
अजूनही बघायला मिळतात् ,  अशा कोणत्याही अंधश्रद्धेला वाव
देण्याचा माझा हेतू नाही तर , अंधश्रध्दा निर्मुलन करण्याचा हा एक छोटासा प्रयन्त आहे . काही चुकलं असेल तर माफी असावी . देव म्हटलं की भावना असतात आणि त्या दुःखवण्याचा माझा हेतू नाही ...


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...