नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 29, 2023

सहवासात तुझ्या

सहवासात तुझ्या असताना ..
मी ही होऊन जाते लहान पाखरू ..

भिरभिरणार ..मनसोक्त जगणार ..

तुझ्यात सामवतांना ..

जीवनाचे सुर विसरून जाते..

तुला हव्या असणाऱ्या प्रत्येक बेसूर ,

सुरात रंगून जाते...

हट्ट पुरवताना तुझे ,

मी ही

हट्ट करायला शिकते ..

हट्ट करावा कोणाकडे , मग ते ही विसरते ..

तुझ्या सारख्या च सवयी मला जडल्या .
त्या सवयी पाहून साऱ्या मैत्रिणी हसल्या. 
त्याचं हसू ही , सहज सहन केलं ..
फक्त तुझ्यासाठी बाळा ..

तुझ्यामुळे जगण्याला नवा बहर आला ..
जरी स्वप्न खुणा अपूर्ण राहिल्या ..
तरी सुखी आयुष्याचा मंत्र ..
तुझ्यामुळेच गवसला ..

Written by - durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...