नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 18, 2023

छंद

धावपळीच्या जगात जोपासायला हवा छंद .
आणेन तो ह्या आयुष्याला नवा सुगंध ...

नको असायला फक्त कामात बिझी ...
छंद ..आयुष्य  जगण्याचा पासवर्ड इझी ..

धावपळीच्या जगात नसतो कोणाकडेच वेळ ..
त्यामुळेचं तर नाही बसत , नात्यांचा मेळ ..

धावपळीच जग सुसाट सुटलं ..


सुसाट सुटलेल्या जगात जगायचं मात्र राहून गेलं ..

पैसा कमवण्याच्या मागे माणूस धावू लागला ..

नात्यांची वीण घट्ट पकडून ठेवायचं विसरू लागला ..


जगावं आपल्याला हवं तसं कोणाची ना - नाही ..


पण : जगताना छंद जोपासायचा सल्ला देऊ शकते ही ना ताई .....


एकच सांगते जस जस वर्ष पुढे जातील ..


तशी तशी धावपळीची प्रक्रिया ही वाढेल ..पण एकच सांगते ह्या धावपळीच्या जगात प्रत्येकाने एक तरी छंद जोपासायलाचं हवा ..जो जगण्याची उमेद ठरेल , नवं काहीतरी करण्याची प्रेरणा ठरेल . आपल्या प्रॉब्लेमवरचं सल्युशन ठरेल ..मी जोपासलाय छंद लिखाणाचा ..तुम्ही ही जोपासा एक सुंदर छंद आयुष्य जगण्याचा ..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...