धावपळीच्या जगात,
झालीच भेट ,
तुझी माझी ..
कधीच न ठरलेली.
क्षण भर वेळ नसतो ..
तरीही तुझ्या प्रती ,
आपलेपणा वाटतो ..
का कुणास ठाऊक ?
अनोळखी नात्याला ,
असा कसा अंकुर नवा फुटतो ...
कळी खुलते हास्याची ...
सावली चेहऱ्यावर ..
पडते तुझ्या चेहऱ्याची...
अजूनच वीण घट्ट होते.
आपुलकीची......
धावपळीच्या जगातील ,
भेट ही किती गोड ..
सतत मनाला लागलेली असते ..
तुझी ओढ.
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.