कितीदा रडूनी जीवाने हसावे ..
तुझ्या आठवणीत गुरफटावे ..
कितीदा आसवे गाळावी...
प्रीत मनीची हिरमुसू द्यावी ..
उमललेली फुले झाकून का ठेवावी ..
कोमजताना का पहावी...
कितीदा मांडावा खेळ भावनांचा...
का करावा प्रयत्न मी खोटं खोटं हसण्याचा...
का तू प्रेमाला माझ्या चकवा द्यावा...
क्षणोक्षणी माझा जीव घ्यावा ..
सांग सख्या , तुझ्या साठी मी कितीदा रडावे...
रडून ही नव्याने कितीदा हसावे....
No comments:
Post a Comment
Comments plz.