असा कसा रे तू ?
हळुवारपणे येतोस ..
कानी गुंजतो ..
आणि लगेच हरवून जातो ..
असा कसा रे तू ?
सरी प्रमाणे येतोस ..
प्रेमात तुझ्या चिंब चिंब भिजवतो ..
आणि लगेच अवखळ वारा होतो .
असा कसा रे तू ?
साद ही घालतो...
आणि दुरावा ही साधतो.
तुझ्या विश्वात मला मोहून टाकतो ..
असा कसा रे तू ?
प्रेम ही करतो ..
आणि नफरत ही करतो...
मला तुझ्यात गुंतवून ठेवतो ..
असा कसा रे तू ..
मनावर ह्या ..
प्रेम गीत ही गिरवतो ..
आणि विरह यातना ही देतो ..
असा कसा रे तू?
गोंधळात ही टाकतो ..
तरी ही पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पाडतो ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.