एक मितवा माझा ही असावा ...
मला त्याच्या मित भाषेत मोहून टाकणारा ..
मला त्याच्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा.
त्याच्या आयुष्यात सामावून घेणारा...
नेहमी सकारात्मक रहा सांगणारा.
तास न तास समुद्र किनारी बसून गप्पा मारणारा ..
दिलखुलासपणे स्वतः ही जगत असणारा ..
आणि तू ही असच जगण्याचा प्रयत्न कर सांगणारा ...
आपल्या दोघांचं विश्व आपल्यातच ठेवू ..
सप्तपदी न चालताच सात जन्माच वचन देऊ ..
आणि एकमेकांना आयुष्यभर अशीच साथ.
सांगणारा...
एक मितवा माझा ही असावा ..
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.