मनातील डायरी चे पान विषयाअंतर्गत ...🌹🌹🌹🌹
विषयाचे नाव : लिखाणाची पुनरावृत्ती नको ..
ती पुनरावृत्ती अपमान आहे . लेखणीचा ..
लेखणी लेखकाची जीव की प्राण ..
लेखकाच्या हातून नेहमीच होतो तिचा सन्मान ..
नेहमी राखावा तिचा मान..
चुकूनही होणार तिचा अपमान ..
जबाबदारी आहे लेखकाची ..ठेवावी जाणं ..
तुम्ही म्हणाल आज दुर्गा ने हे काय लिहिलंय वेड्यासारखं ..लेखक कधी जाणून - बुजून त्याच्या लेखणीचा अपमान करतो का ? माझं पण उत्तर नाहीच असेल . कुठलाच लेखक , कवी मुद्दाम हून त्याच्या लेखणीचा त्याच्या कलेचा अपमान नाही करत . पण कधी कधी त्याच्याच हातून कळत - नकळत त्याच्याच कलेचा अपमान होतो . आणि हे त्याच्या लक्षात ही येत नाही. आज ही मला वाटणारी सर्वात मोठी खंत आहे . तर तो अपमान कळत नकळत कसा होतो . हे मी थोडक्यात स्पष्ट करते . उदाहरण म्हणून मी लेखक च घेते . आणि त्या उदाहरण मी स्वतः होते . मला कोणाचंही मन दुखवायचं नाही हे , पण चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचा प्रामाणिक पने प्रयत्न करायचा . कारण माझ्या कलेवर माझं खूप प्रेम आहे . आणि त्याचा नकळत ही अपमान न व्हावा एवढीच इच्छा आहे ..
लिखाणाची पुनरावृत्ती नको ..
ती पुनरावृत्ती अपमान आहे . लेखणीचा ..
हा माझा आजचा विषय ..
जरा डोकं खाणाराचं आहे ना ..hmm पण सहज नाही सुचला . आज सकाळी स्वाती ताईंशी बोलण झाल .
लिपीवर प्रीमियर सुविधा अंतर्गत एका पुस्तकाने खूप पैसे कमावले आणि तेच पुस्तक प्रकाशित होऊन त्याला ही खूप प्रसिद्धी मिळाली . पण आश्चर्य चकित करणारी एक गोष्ट आहे . त्या गोष्टीचं मला खूप वाईट .
ते पुस्तक 7- 8 वर्षापुर्वीच एका लेखकाने प्रकाशित केलेलं होतं . आणि आज तेच पुस्तक आज पुन्हा प्रकाशित झाल घटना तिचं फक्त घटना मांडणारा वेगळा . मी त्या पुस्तकाचं नाव आणि लेखकांचं नाव मुद्दाम हून लिहिलं नाही कारण मला कोणाचही मन दुखवायचं नाही .सो असो ही नकळत घडली अस आपण गृहीत धरू आणि सोडू देऊ ..
माझं एवढंच म्हणणं आहे . आपण लेखक आहोत . कवी आहोत . आपण आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर खूप साहित्य निर्मिती करू शकतो . आणि ती साहित्य निर्मिती करन आपला अधिकार आहे . पण साहित्य निर्मिती करताना कोणाचंही साहित्य घेऊन त्याच्यावर आपल नाव टाकून प्रकाशित करण साफ चुकीचं आहे . त्यावेळी खरोखर आपल्या लेखणीचा आपल्या कलेचा अपमान होतं असतो . आणि हे आपल्या लक्षात ही येत नाही .
एखाद्याचं साहित्य खूप खूप आवडल त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा . त्या साहित्याला एवढी प्रसिद्धी मिळाली . मग आपण ही तसचं लिखाण करू थोडा फार फेर बदल करून हा विचारच मुळात चुकीचा आहे . आणि हा विचार अनेक जन करताना दिसतात .
उदाहरण : रामायण आणि महाभारत केवढी गाजलेली ग्रंथ आहेत . ती आता नवीन लेखक लिहितांना दिसतात . ही काय ह्यांनी लिहिली आहे . मग त्या लेखकाचे खरे लेखक काय फक्त नावाला आहेत . मान्य करते नवीन लेखक त्या विषयाचा अभ्यास करून प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न करतात . पण ते चुकीचं आहे . लोकांना मुळात रामायण महाभारत आवडत. म्हणून तुमच्या पुस्तकाला प्रसिध्दी मिळते . पण त्यावर तुमचं नाव असण चुकीचं आहे . कारण त्याचे खरे लेखक च त्या नावाचे मानकरी आहेत . कारण तुम्ही जरी ते पुस्तक प्रकाशित केलं असलं तरी त्याच्यासाठी खरा अभ्यास आणि मेहनत ही खऱ्याच लेखकाची आहे. त्यामुळे तुम्ही पुस्तक प्रकाशित करा . त्यातून पैसे मिळवा प्रसिद्धी मिळवा काहीचं हरकत नाही . पण जेव्हा तुम्ही लेखक म्हणून तुमचं नाव लिहाल ना , तेव्हा तुमच्या नावाआधी खऱ्या लेखकाचे नाव लिहायला विसरू नका ..
Infact लिखाणाची पुनरावृत्ती करन चुकीचंच आहे . ती पुनरावृत्ती म्हणजे अपमान आहे . लेखणीचा . ती पुनरावृत्ती होऊ नये . ह्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्नशील रहायला हवं .
आपण कल्पना शक्तीच्या जोरावर विविध विषयावर खूप लिखाण करू शकतो . आणि तेच करायला . ते लिखाण करतांना कोणाच्याही साहित्याची चोरी करू नये .
कोणाचं कितीही लिखाण आवडल तरी त्याला , भरभरून दाद देणं एवढंच मनात ठेवावं . आणि आपण ह्याच्याही पेक्षा सुंदर विषयावर लिखाण करू हाच विचार मनात ठेवावा . नक्कीच तुमच्या लेखणीची उंची वाढेल .आणि तिचा अपमान ही होणार नाही .
हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . तरीही नकळत कोणाचेही मन दुखवल्या गेले असेल तर आधीच माफी मागते 🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
Comments plz.