मनातील डायरी चे पान विषायांतर्गत ...
काल 8 जागतिक महिला दिन ..
काल वेळ नाही झाला म्हणून आज लिहिते ...
तिचा सन्मान फक्त त्या एका दिवशीच नको करायला . दररोज करायला . ती रोजचं दुसऱ्यासाठी जगते . मग तिचा सन्मान एकाच दिवशी का ?
ती तुमची आई होते ..बहिण होते . कधी गुरु होते . कधी मैत्रीण होते . सुख दुःखात साथ देते . बदल्यात काहीचं मागत नाही . ती काही मागत नाही . म्हणून आपण काही देऊ नये . हैं तो गलत बात है ना..त्यामुळे दररोज तिचा सन्मान करावा . तेवढंच तिला खूप बरं वाट्टेल . आपण सर्वाच करतो . ह्याचं तिला कधी ओझ नाही वाटणार . उलट ती खूप आनंदाने ती गरजेपेक्षा जास्त करेल तुमच्यासाठी आधीच खूप करते . तिचा सन्मान जर केला रोज . तर ती खरच खूप महत्त्व देईन .
सन्मान म्हणजे तरी काय हो ...
फक्त तिला पर्सनल स्पेस द्यावी . चार चौघात तिचा अपमान होणार नाही . ह्याची काळजी घ्यावी . तिला जगण्याचं आणि वयक्तिक विचारांचं स्वतंत्र द्यावं . तिच्या डोळ्यातील अश्रू च नाही . तर , तिच्या चेहऱ्यावरील हास्याच कारण बनावं ..बास ह्याच्यापलिकडे काहीचं नको असतं तिला ..अशा रीतीने दररोज तिचा सन्मान करावा .
दुर्गा मते
थँक्यू सो मच ...
खूपचं छान लिहिलं आहे..पिल्लू...👌✍️👍✍️✍️
ReplyDelete