नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 8, 2022

महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

Happy womans day 💐💐💐
   All of you ...🍫🍫🍫🍫

स्त्री शक्ती एक अद्भुत रहस्य ...

कोड तिच्या मनाचं आणि तिच्या स्वभावाचं कधी उलगडणार नाही . हळवा ही तेवढाच कणखर ही तेवढाच ..ती एखाद्यावर जीवापाड प्रेम ही करू शकते . आणि एखाद्याचा गरजेपेक्षा जास्त तिरस्कार ही करू शकते . स्त्री आहे ती एक अद्भुत रहस्य कधीचं न उलगडणार कोड ...हा पण प्रत्येक स्त्री मध्ये एक गुण समान असतो . ती कधीच कोणा चाही मनापासून राग नाही करत . तिची चीड चीड तिचा गुस्सा हा काही क्षणापुरताच असतो . थोड्या वेळ गेला घडलेल्या गोष्टीचा विसर पडला की ती पूर्वीसारखी active होते ..

आणि हे  माझ्या बाबतीत खूप वेळेस घडत ...म्हणून मुद्दाम हून पॉइंट मांडला ....आणि तेव्हा कोणाबद्दल मी कसा विचार करेन हे माझं मलाच सांगता येणार नाही .😝😝😝😂😂😂

असो आज आहे womans day आज त्या प्रत्येक स्त्री चा  आवर जून सन्मान करावा असा दिवस ...

जिने आपल्याला जन्म दिला त्या आईचा .
ज्या बहिणीने तिच्या वाट्यात आपल्याला वाटेकरी होऊ दिलं त्या बहिणीचा ..
जिने राजा - राणीच्या छान छान कथा सांगितल्या त्या आजीचा ..
पुरणपोळीचा घास भरवण्याऱ्या मामीचा ..
प्रत्येक हट्ट हक्काने पुरवणाऱ्या गोड गोड मावशीचा  .
आई प्रमाणे जीव लावणाऱ्या काकूंचा ..
आणि मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करायला हक्काची एक सखी ...असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात गौरव करूया आज त्या सखीचा ..

जरी स्त्री वेग वेगळ्या नावांनी गुंफलेली ..
प्रेम - माया - ममता जिव्हाळा यानेच ती जाते ओळखली ..

आज जागतिक महिला दीन मी भेटून गिफ्ट नाही देऊ शकत कोणाला कारण भेटायला कोणी इथे आसपास नाही राहत . पण ह्या लिपीवर खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या. प्रत्येकीने मला लहान बहीण समजून मी कितीही चुका केल्या तरी माफ केल ...आणि तू छोटी आहेस अजून अस म्हणत चुका करायला मोकळीक दिली . आणि मी पण त्याचा पुरेपूर फायदा घेते .😝😝

मी फार काही नाही देऊ शकत,  पण आजच्या ह्या छान दिवशी प्रत्येक मैत्रिणी साठी खास काहीतरी लिहिण्याची इच्छा होती . म्हणून आज थोड थोड माझ्या प्रत्येक मैत्रीणी साठी ..

सुरुवात कोणापासून करावी तेच कळत नाही हे ,  starting कोणीही असो ending कोणीही प्रत्येकी साठी मनात तेवढंच प्रेम आणि आदर आहे . हे 💯💯💯💯💯💯आणि मी आधीच सांगते मी प्रत्येकी. शी रोजचं नाही बोलत . पण ओळखते मात्र सर्वांना प्रत्येकी शी छान नातं आहे..

थँक्यू सो मच आई ..
मला जन्म दिलास माझ्या आयुष्याला आकार दिलास ..
थँक्यू सो मच तुझ्यामुळे आज मला हे सुंदर जग बघायला मिळालं ...कितीही लिहिलं तरी उपकाराच ओझ काही फिटणार नाही ....तुला आजच्या ह्या  खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..💐💐💐




🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आधी कोणाचं लिहू कळत नाही हे , पण लीहीतेच ..

बघून त्यांना अस वाटतं ...
आनंदाने जीवन जगण्यासाठी ..
वयाच घेणं देणं सोडून द्यावं लागतं ..
चारोळी त्यांची आवडती श्रेणी ....
त्यात नेहमीच असतात त्या टॉप1 वर ..
ओळखा पाहू कोण ?
जाऊ दे मीच सांगते ...




रंजू ताई ...माझ्या खास मैत्रीण थँक्यू सो मच ताई कशासाठी ? माझ्याशी मैत्री केली त्यासाठी ...आणि माझ्या आयुष्यात आलात त्यासाठी ...



सुंदर विचारांची माझी सुविधा आई ..
लीपिवरील सर्वात पहिली मैत्रीण ..
मी सर्वात जास्त त्रास ह्यांनाच दिलेला असेल ..
तरीही त्यांनी कधी मनावर नाही घेतल .
आणि अंतर तर अजुनही नाही दिलं ....
आई म्हणते मी त्यांना म्हणून  हक्काने रागवतात ....
पण त्यांच्या रागवण्याचा मला नेहमी फायदाच झालेला आहे . त्यांच्यामुळे माझी एक वाईट सवय मोडली आहे .
खरच थँक्यू सो मच माझ्यावर योग्य वेळी रागवलात त्यासाठी आणि आज  हक्काने सांगते मी जेव्हा जेव्हा ही चुकेल ना तेव्हा तेव्हा हक्काने रागवा . कारण माझा राग एक क्षण असतो . पण जी सुधारणा होते ना ती नेहमी साठी होते ....थँक्यु सो मच 😘😘🍫🍫



ही माझी आई आहे ...
ह्यांना पण मी आईच बोलते ...
त्यांचं आणि माझ नातं पण खूप खास आहे .
मनाने खूप प्रेमळ ..
रचना ही एक नंबर करतात ...
आणि ह्याची बहिण ह्या त्यांना तायडे बोलतात ..
म्हणजे माझी अनघा आई ...




  
खूप म्हणजे खूप प्रेमळ ...
वाचनाची प्रचंड आवड ...
लिखाणातून चं ओळख झाली ...
बोलता बोलता ओळख वाढली ..
देव बाप्पाने तिची भेट घडवली ...
छान जोडी जमली माय लेकींची ..

आता बहिणीसाठी ...मला तर इथे खूप बहिणी मिळाल्या रिअल लाईफ मध्ये बहिण नाही . ह्याचं वाईट पूर्वी जास्त वाटायचं आता एवढं वाटतं नाही ..

कल्पना ओन्ली आय डिया  ताई ...दीक्षा ताई ..शशी ताई ..जयश्री ताई , नेहा ताई ..पूजा दि .. वैशू ताई ह्या माझ्या  सर्वात लाडक्या बहिणी ....




Dashing ..पाटलाची वाघीण ..
कल्पना ताई ..तिचा एक गुण मला खूप आवडतो ..
ती कधीच कोणालाच घाबरत नाही ..
आणि तू पण कधीचं कोणाला ही घाबरायच नाही .
सतत सांगते ..
ती कधी माझी आई होते ..कधी बहिण होते .
तर कधी माझी  मैत्रीण होते . खरच काय लिहू हिच्याबद्दल खूप गोड सखी आहे ही . तिने नेहमी मला suport केलेला आहे . तिचं आणि माझं नातं चं खूप छान आहे.  ते शब्दात सांगन कठीण आहे .

आता हिच्या मुळे मला एक गोड मैत्रीण मिळाली ..
रायगड ची शिवकन्या.. अहो कोण काय ? हीची डबल कॉपी म्हणजे दीक्षा ताई ..थँक्यु कल्पना ताई तुझ्यामुळेच आज आमची छान मैत्री जमलेली आहे .




दिसायला गोड ..बोलायला गोड ..
म्हणून असते रोज हिला बोलण्याची ओढ .
दररोज एक तरी मेसेज होतो ..
मी विसरले की ती करते .
ती विसरली  की मी करते ..
काहीही झालं तरी एकमेकींना एकमेकींचा विसर नाही पडू देत .......
सगळ्यात फास्ट माझी मैत्री हिच्याशी झालेली आहे.  आणि ती अजुनही छान होत चालली आहे . कारण ती एवढं छान बोलते ना तिचं बोलण ऐकत चं  रहावं वाटतं ..

जयश्री ताई.  
प्रेमळ ..शांत आणि सुस्वभावी ..
हा पण dashing पण आहे हा .. आमचं नातं पण खूप छान आहे . तिच्यावर तर मी पूर्वी खूप मोठा लेख लिहिला होता . तिला तो खूप आवडला होता ..त्यामुळे आज थोडच लिहिलं कारण तिला पण माहितेय मी सध्या खूप बिझी आहे . आणि ती मला समजून घेईल . कारण तिने  मला समजून घेण्याचा वसा घेतलेला आहे . तू छोटी आहेस ग अजुन म्हणून सतत माफ करते . आणि मी तिला खूप त्रास देते ..पण ताई प्लीज मला जशी आता समजून घेते तसचं नेहमी समजून घे . एवढीच विनंती ..
आय लव्ह यू ❣️❣️❣️❣️

शशी ताई ...

ह्या मॅडम तर फोटो देणार नाही . हे माहितेय मला म्हणून मी तिला मागितला च नाही . पण माझा बघा कारण दिसायला ती आणि मी same आहोत व्हिडिओ कॉल झाला ना त्यामुळे माहितेय .. आमचे स्वभाव पण same आणि वागणं पण same ..

तिचं माझं गमंत करत करत जुळल नातं .
मी 84 वर्षाची आणि ती 10 अशा गमंती तून नातं निर्माण झालं .
व्हिडिओ कॉल वर बघते तर समोर मॅडम आणि माझी बोलती बंद . पण अजूनही आमच्या नात्याची सुरुवात जशी झाली होती . तशीच आहे . एकदम गोड ..दोघींनाही फक्त हसायला आणि हसवायला आवडत . म्हणून कधाचित आमचं नातं safe आहे ..

शुभदा ताई ..




नाव स्वभाव आणि दिसण सगळचं छान ..
हीच्यासारखी मैत्रीण मिळाली .
पूर्व जन्मी खूप केलं असेल पुण्य म्हणून ..
हे ऋणानुबंध जुळल ..
खरच सांगते . तुम्ही सगळ्याच जनी खूप गोड आहात ह्यात संशय नाही . पण हिच्यात नक्की काही तरी वेगळं आहे.  म्हणून ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ..
छोटी कशी आहेस ? असा एक दिवस आड मला मेसेज असतो . बोलण नेहमी नाही होतं.  पण मेसेज नेहमी होतो . तिने नाही केला तर मी करते मी नाही केला तर ती करते.खूप छान मैत्रीण आहे.  ही सगळ्यात आगळी वेगळी ..😊😊😊




गोड मैत्रीण हवी अशी ..
मानसी दि सारखी ..
दिसायला तर ती खूप सुंदर आहे ..
पण मनाने ही खूप चांगली आहे .
मी तिला ताई च बोलते पण  नातं माय लेकी प्रमाणेच आहे ...
ती मला आवडीने पिल्लू बोलते . मी तिची लाडकी आहे . सर्वांना सांगते . कधी परी तर कधी पिल्लू ह्याचं नावाने ती हाक मारते ..
अशी आई सर्वांना मिळावी एवढीच प्रार्थना करते ..
बिचारी नेहमी आजारी असते . 
म्हणून काळजी वाटते ....
म्हणून तिला आठवड्यातून एकदा तरी काळजीने मेसेज करण्याची इच्छा होते ...
खूप गोड  आणि हसरी मैत्रीण आहे ..




प्रकार कोणताही असो लिखाणाचा ..
लिखाणात हात नाही धरू शकणार कोणी वैशु ताईचा ..
तिने मला अलक हा प्रकार शिकवला तिच्यामुळेच मी आज अलक खूप चांगल्या प्रकारे लिहू शकते ..
थॅन्क्स वैशू ताई.....
ती  मला नित्याराणीच बोलते ..ग्रुप वर आम्ही धमाल करतो ...स्वभावाने खूप छान आहे ...




अश्विनी ताई ...
आमच्या वयात फार अंतर नाही ..
म्हणून आमचं नातं छान आहे ...
गप्पा - टप्पा नेहमी होत असतात. .
ती ही मनाने खूप चांगली आहे. 
माझ्या पेक्षा खूप समजदार आहे .



पूजा दि
माझी नवीन मैत्रीण हल्लीच झाली .
पण खूप लवकर खूप छान घट्टी जमली ..
कारण आम्ही एकाच भागात राहतो ना .आमची कधीही भेट होऊ शकते . त्यामुळे आता जोडलेली मैत्री तोडण अशक्य आहे . आणि आमचं आधीच ठरलेले आहे . जोडायच म्हणून जोडायच नाही तर टिकवायचं म्हणून जोडा यचं आणि नात तुटू शकनार नाही . कारण ती स्वभावाने खूप ग्रेट आहे ..




जानवी ताई म्हणजे माई ..पूजा दि आणि माझी पण ..
खूप छान स्वभाव माझ्या birthday च्या दिवशी पासून आम्ही एकमेकींना ओळखतो ...खूप दिवस नाही झाले
पण खूप कमी दिवसात खूप छान नातं निर्माण झालं . कारण त्यांचा छान स्वभाव ..दोन दिवस मी लिपी आणि wp दोन्हीवर पण नव्हते ..तेव्हा त्यांनी काय ग नीतू कुठे दोन दिवस दिसली नाही. मेसेज करून विचारलं खूप छान वाटलं ..




स्वाती ताई ..
लिखाण खूप छान असत त्यांचं .
लिखाणात नाविन्यता असते ..
स्वभाव पण छान आमचं नेहमी बोलण होतं .
आम्ही खूप दिवसापासून ओळखतो एकमेकींना ..
कॉलिंग वर पण भरपूर वेळेस बोललेलो आहे . भेटण्याचा च योग काय माहित कधी येतो ? .
येईल तेव्हा येईल ..पण आमचं कमिनिकेशन काही बंद नाही होणार ...हे नक्की ...



राजश्री ताई .


टीचर असल्यामुळे प्रेमळ स्वभाव ...


खरच खूप प्रेमळ स्वभाव आहे ..


गुड मॉर्निंग च नेहमी मेसेज असतो . आणि वेळ काढून बोलण होत.  कधी कधी मी खूप घाबरते . तेव्हा त्यांना कळाल की त्या मला नेहमी सांगतात.  अग घाबरु नको ग होईल सगळ ठीक ..अशा ह्या राजश्री ताई माझ्या खूप चांगल्या मैत्रिण आहे ...


अजुनही बऱ्याच आहेत. त्यांच्या साठी पण लिहायचं होतं .


राणी ठाकरे ..


ती. पण खूप छान आहे स्वभावाने आणि माझी खूप चांगली मैत्री न पण आहे . ती माझ्या wp वर नाही म्हणू.न तिचा फोटो नाही माझ्याकडे ..


आणि अजुन एक नेहा स्ना ..सगळ्याची आवडती ..


ती पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे


तिचं लिखाण मला खूप आवडत स्पेशली शायरी ..


तिच्या शायरी ची मी खूप मोठी फॅन आहे ..तिचा ही फोटो नाही हे कारण ती आजच wp जॉईन झाली .


शीतल आणि वर्षा जगताप माझ्यासाठी खूप खास वर्षा ताई खूप सुंदर रचना लिहिते . आणि शीतल माझी बेस्ट फ्रेंड आहे .. खूप dashing माझ्याच वयाची पण माझ्या पेक्षा खूप हुशार आहे . तिची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही ..ह्या प्रतीलिपी ला मनापासून धन्यवाद तिच्या मुळेच आज मला ह्या गोड गोड मैत्रिणी मिळाल्या ..


आज माझ्या ह्या सर्व गोड गोड मैत्रीणीना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही घर आणि नोकरी सांभाळून खूप सुंदर कविता लेख लिहिता . तुम्ही सर्वच जणी माझ्या आदर्श स्थानी आहात . हा लेख लिहिण्याचा एवढाच उद्देश आहे . माझ्या मुळे तुमच्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर थोडी का होईना smile माझ्यामुळे ह्यावी . बाकी काहीच नाही .


आणि ज्यांना मी चुकून विसरले त्यांना खरच सॉरी त्यांच्यासाठी माझ्या मनात आदर किंवा प्रेम नाही अस नाही . पण आमच्या कडे लग्नाची गडबड आहे . त्यामुळे खूप लिहायचं होत. पण कमीच लिहिलं ..कारण एवढा वेळ नाही माझ्याकडे ..


महिला दिनाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫❣️❣️❣️❣️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...