आजवर रडलेच तर होते ..
घाव मनाचे दिसू नये म्हणून ..
ओठांवर हसू फुलवत होते ..
त्यात यशस्वी होत होते ..
आजही नशिबाचे ऐकतेय ..
मनाला जाळतेय ..
कंठ भुकेला झाला , हुंदका गहिवरून आला ..
श्वास हा चालू असताना ही स्थब्ध झाला ..
पापणी मिटेना ..अश्रू हि थांबेना ..
देह हा ओल्याचिंब आसवाखाली भिजलेला ..
हळुवार येता सुखाचे स्पर्श तरीही कोरडा होईना.
अनुभवाचे चटके बालमनावर कोरलेले ..
त्याच मनावर आज अनुभवाचे चटके झेलत ..
दुःख नवे रुजलेले .
सांगता ही येईना ..
बोलता ही येईना ...
मन मोकळं करायला हक्काच ठिकाण ही गवसेना .
दुर्गा मते
©®
भावस्पर्शी रचना 👌👌👌
ReplyDeleteओह..!!
ReplyDeleteखूप भावूक
Really heart touching..!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा
🙏