नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 25, 2022

देव भेद भाव नाही करत.

हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . वाटलं म्हणून सहज मनातलं लिहिलं एक छोटासा अनुभव ...

त्या दिवशी आम्हाला खूपच तहान लागली होती . नरड कोरड ठक पडल होतं . आभाळ ही खूप तापलं होतं . तापलेल्या आभाळा खाली जीवाची लाही लाही होतं होती.  जीव नुसतं पाणी पाणी करत होता ..


रस्त्यावर एका ठिकाणी पाणे पोई दिसली . ती पानेपोई मुस्लिम धर्माच्या लोकांनी लावलेली होती.  तहान एवढी लागली होती . की लक्षात ही नव्हत आलं . नक्की ही पाणे पोई कुठल्या धर्माची आहे. थंडगार पाणी घटा घटा  पिल जीव शांत झाला .


तो माणूस थोड्याच वेळाने माईक मध्ये काहीतरी पुकारू लागला .


पाणी पिऊन झाल्यानंतर आत मध्ये येऊन शिबिराला भेट द्या . त्या शिबिरात पुस्तक होते.  ते ही फ्री मध्ये कुठलही पुस्तकं घ्या . त्याची फिस घेणार नव्हते. 


मी जाऊन पाहिलं तर त्यामध्ये सगळे मुस्लिम धर्माच्या रीले टेड पुस्तक होती . पण मी ते न घेताच वापस फिरले .


पुस्तक घरी घेऊन गेले तर खूप बोलणे खावे लागले असते माहीत होतं म्हणून पाणी मात्र पोटभर पिले .


आणि मग मनात आलं . त्यांचं पाणी पोटभर पिले . मग कुराण घ्यायलाच का पाऊले थबकली .


आपण  पोटासाठी तहान भागवण्यासाठी त्यांची मदत घेतो . जात पात बघत . देवाचे पाय पडताना धर्माचा अभ्यास करताना चं का बघायची जात पात ..कोणत्याही धर्मातील देव कधीही भेदभाव करत नाही . हा माझ्या जातीचा नाही म्हणून दूर लोटत नाही .


येशू ख्रिस्ताकडे जा तो आशिष देतो . विठ्ठलाकडे जा तो ही जवळ करतो . अल्ला ही दुवा देतो . माणूस स्वार्थी विचार करतो देव कधीच करत नाही. 


जर आपल्याला त्यांचं पाणी चालू शकतं तर , मग देव आणि धर्म चालायलाच हवा.  तो मान्य करण्यात कोणताही कमीपणा वाटू न द्यावा ..😊😊😊🙏🙏🙏
दुर्गा मते

चुकून काही कमी जास्त लिहिलं गेलं असेल तर , चुकी साठी माफी असावी.  जे मनातून  वाटलं ते मी प्रामाणिकपणे लिहिलं .


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...