नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 26, 2022

नव्याने आठवले ..

पापण्याला भास छळू लागले ..
फुलांचे थवे ..सुर नवे गाऊ लागले ..

आठवणींच्या गावी परतून ही आली ..
कोमजणे लिहिलेले टवटवीत फुलांच्या भाळी ..

उदबत्तीचा सुगंध वाऱ्यासवे उडून गेला ..
नवतिचा प्रवास आज नव्याने केला ..

हळवे मन भासू लागले लाजळूचे पर्न ..

विरहाचे हुंदके ऐकताना बधीर झाले कर्ण ..

ओलेचिंब झाले डोळे ..आठवताना क्षण कोवळे ..

अजीब त्या पटलावर रंगले होते विरहाचे सोहळे ..

मनाच्या तळ्यावर नाव एकाचे कोरलेले ..

मेहंदीच्या हातावर स्वप्न कोणा दुसऱ्यासाठी रंगलेले .

चित्र ते समोर डोळ्यापुढे उभे राहिले ..

त्याला कित्येक दिवसांनी आज पाहिले ..

सुवर्ण क्षण आज नव्याने आठवले ..
दुर्गा मते

काल्पनिक रचना ..


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...