गंध चाफ्याचा . मेहंदीचे पान ...
घराची तू शोभा ..
आईच्या काळजाचा तुकडा ...
बापाची लाडकी परी ..
नसते जेव्हा घरी ..
डोळ्यात येते पाणी ..
असे लाडकी ती राणी ..
कानी येता बोल - बोबडे शब्द तिचे ..
डोळ्यांचे पारणे फिटे ....
ती आनंदाची प्रकाश ज्योती ...
उंबरठ्यावर ह्या शोभून दिसे पणती ..
लाडकी लेक आमुची ....
शोभा वाढवते घराची...
हसताना दिसते ती छान ..
गंध चाफ्याचा मेहंदी चे पान ...
दुर्गा मते ..
No comments:
Post a Comment
Comments plz.