नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 25, 2022

अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे ..

अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो . हे वाक्य तोंडपाठ झालय पण प्रत्यक्षात उतरायचं मात्र अजूनही बाकीचं आहे ...

अन्याय करणाऱ्याला अन्याय सहन करणारा मोकळीक देत असतो.  त्यात अन्याय सहन करणारा गरीब अन् लाचार असेल तर , मग बघायलाच नको . अन्याय करणारा किती खालच्या दर्जावर जाऊन भ्रष्टाचार करेल ते
सांगता येत नाही. 

गरीब असो लाचार असो , सुसुक्षित असो असुसुक्षित असो ..होणार अन्याय कधीही सहन करायचा नाही.  अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहिजे. 


आपण  आपल्या वर होणारा अन्याय सहन करत राहिलो.  तर तो अन्याय आपल्याला आयुष्य भर सहन करावा लागतो.  अन्याय करणाऱ्याच्या डोळ्यासमोर खुळा भ्रम तयार होतो . आपण ह्याच्याशी कसही वागलो.  तरी ह्या येड्याला काहीचं फरक पडत नाही . असा नकारात्मक  विचार करत अन्याय करणाऱ्याची मजल अजूनच वाढत जाते . आणि आपण त्याच्या वर्चस्वाच्या दबावाखाली दबलो जातो .


अन्याय हा फक्त कामाच्या ठिकाणीच होतो.  असं नाही . तो अगदी आपल्याच हक्काच्या घरातही  होतो . हे  आपलच घर आहे.  आपलीच माणसं आहेत . असा विचार करत आपण त्यांचं उन - धून बोलण सहन केलं ना तर मग आपली किंमत त्यांच्या नजरेत शून्य होते . त्यामुळे अन्याय हा कोणत्याही ठिकाणी होतं असेल तरी  , तो सहन नाही करायचा.  आपल्या हक्कासाठी नेहमी लढा द्यायला सज्ज रहायचं .


आणि महत्वाचं म्हणजे अन्यायाला वाच ही योग्य वेळेतच फोडायला पाहिजे . वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा नसतो . वेळ निघून गेल्यावर एक तर आपण आपला जीव गमावलेला असतो किंवा मग आत्मविश्वास ....


कोणीतरी येईल माझ्यावर होणारा अन्याय दूर करण्यास .


ह्या खुळ्या आशेत तर बिलकुल रहायचं नाही.  आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण स्वतःच आवाज उठवायला पाहिजे .


कोणीतरी येईल ह्या आशेवर जर राहिलो ना , तर कोणी  येणार पण नाही . आणि तुमच्यावर होत असलेलाअन्याय


कधी थांबणार ही नाही . त्यामुळे स्वतःसाठी स्वतःच समर्थ


असणं केव्हाही चांगलं .


जो अन्याय सहन करतो ना तो आयुष्यात कधी यशस्वी ही होऊ शकत नाही . आणि कधी आनंदी ही राहू शकत नाही . त्यांच्या आयुष्यातील दुःख सरता सरणार नाही. 


सुख ओंजळीत असताना ही झेलता येणार.  आयुष्य नावाचं कोडं त्याने सोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते सोडवता येणार नाही . कारण ज्याला स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच बळ नसेल त्याला जगण्याचं बळ काय येणार ?


माणूस हा परिपूर्ण आणि सक्षम तेव्हाच होऊ शकतो . जेव्हा तो अन्याया विरूद्ध लढा द्यायच शिकतो . जेव्हा तो अन्यायाविरुद्ध लढा द्यायला शिकतो ..तेव्हाच तो मनासारखं जगायला ही शिकतो ..

दुर्गा मते
©®


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...