म्हणतात जीव लावलेल्या माणसाला आपण कधीच विसरू शकत नाही . ते अगदी खरं आहे . कितीही प्रयत्न केला तरी त्याला विसरण अशक्य असतं .
जीव लावलेला असतो ना मनापासून मग कस विसरता येईल त्याला आणि ते विसरण अशक्य आहे.
गुंज हलकेच सांगितले होते तुला ..
साथ हवी होती मला ...
वेदना तू जाणायचा ....
माझ्या स्वप्नांना हळुवार आकार द्यायचा ...
सुरेख होता प्रवास नात्याचा ...
कसा कोसळला डोंगर दुःखाचा ..
ठावच घेतला त्याने सुखाचा ..
अबोल झाली दोन मन ...
विसरले ते प्रेमाचे क्षण ...
एकमेकांप्रती द्वेष तिरस्कार मनी बाळगला ..
अशा प्रकारे प्रवास नात्याचा संपला ...
एक सुंदर प्रवास त्याचा आणि तिचा संपलेला होता . तरीही सतत त्याचा चेहरा तिला आठवत होता . विश्वास पूर्ण होता स्वतः वर की आपण चुकीचं नाही तोच चुकीचा वागला आपल्याशी तरीही आजही त्याच्यासाठीच तिचा जीव तळमळत होता .
असा कसा हा डाव होता . नियतीचा की नशिबाचा ..
उधळून लावताना ही जीव मेटाकुटीला येत होता . त्याला विसरायचं ती खूप प्रयत्न करत होती . अयशस्वीचं ठरली कारण अजुनही कुठेतरी ती त्याच्यातच आहे अडकलेली होती .
तो तिच्या मनाविरुध्द वागत असताना ती त्याला सतत माफ करायची . आणि तिच्या चांगुलपणाचाच त्याने फायदा घेतला . ही गोष्ट तिला खूप खटकली ...
अखेरीस त्याच्या बद्दल तिच्या मनात असलेलं प्रेम कमी झालं . त्याचा विचार सोडून देण्याचं तिने पक्क केलं .
पण अजून ही तिला विसरू शकत नाही हे , अजुनही ती त्यातच अडकलेली आहे कुठेतरी ...म्हणतात ना , " जीव लावलेल्या माणसाला आपण कधी विसरू शकत नाही . "
हे हिच्या बाबतीत खरं झालं ...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.