तुटलेले स्वप्न माझे ..
तू नव्याने विणले ...
आकाशात नवे चंद्र - सुर्य दिसले ..
त्याच्या प्रकशात नवे किरण गवसले ...
तुझ्या सहवासात अस्वस्थ मन माझे ...
स्वस्थ रे झाले .......
स्वप्न तुटलेले मनात राहिलेले ....
तुझ्यामुळे आज नव्याने पाहू शकले ...
मेघा ला मी हसले ..
बघ रे तुझ्याकडे येण्याचे साधन मज मिळाले.
बोलताना हळूच लाजले...
तुटलेले स्वप्न माझे ..
तू नव्याने विणले ..
दुर्गा मते
खूप सुंदर रचना ✍️✍️✍️👌👌👌
ReplyDelete