आयुष्यात यावं अस कोणीतरी ..
मनापासून प्रेम करणारं
गुलाबाच्या फुलासारखं जपणार ..
आयुष्यात यावं अस कोणीतरी ..
काटेरी वन सभोवताली आहे बोचनारी ..
संवेदना मनाची त्यास कधीच न कळणारी ..
आयुष्यात यावं असं कोणीतरी ..
वेदनेवर त्या फुंकर हळुवार मारणार ..
जखमेवर त्या प्रेमाने मलमपट्टी करणार ..
आयुष्यात यावं असं कोणीतरी ..
नाकाचा शेंडा किती लाल झाला बाई ..
असं म्हणत राग माझा क्षणात सोडवणारा .
घेऊन हाती आनंदाचा मोरपिसारा ..
आयुष्यात यावं असं कोणीतरी ..
अलगद ज्यास मी देऊ शकेल मनाचा किनारा ..
आणि त्याच्या विश्वातचं शोधेल उभ्या आयुष्याचा सहारा ..
आयुष्यात यावं असं कोणीतरी ..
जिवापाड प्रेम करणारा राजकुमार माझा हक्काचा ..
ज्याच्यासोबत प्रवास करयचा आहे ..
सुखी आयुष्याचा ..
आयुष्यात यावं असं कोणीतरी ..
जिवापाड प्रेम करणार ...
गुलाबाच्या पाकळ्या सम आयुष्य माझं तोलनार ..
दुर्गा मते ...
No comments:
Post a Comment
Comments plz.