गंध त्या फुलाचे ..
आयुष्याला लाभले ..
उडालेले रंग जीवनात आले ...
सुखाची उधळण करू लागले .
गंध त्या फुलाचे ..
आयुष्याला लाभले ..
स्वप्न ते सावळे ...
निपचित होते पडलेले ...
नव्याने उभे राहिले ...
गंध त्या फुलाचे ...
आयुष्याला लाभले ..
एकरूप होते धरणीशी ..
संवाद साधत होते अबोल सखीशी ..
नव्हती ओढ त्या आकाशाची ...
त्यानेच केली व्यक्त ईश्चा मैत्रीची ...
गंध त्या फुलाचे ..
आयुष्याला लाभले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.