नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 7, 2022

अशा गोष्टी मुळे मुली येतात ट्रॅप मध्ये ..


मुलींचा स्वभाव मुळातच साधा सरळ आणि प्रेमळ असतो . त्यांना प्रेमाचे रंग दाखवून फसवन कुठल्याही मुलाला सहज शक्य असतं . आणि मुलीही एखाद्या मुलाच्या ट्रॅप मध्ये कशा प्रकारे अडकतात . हे त्यांचं त्यांनाही कळत नाही . मग ते सोशल मीडिया वर असो किंवा रिअल लाईफ मध्ये . कुठेही त्या व्यवस्थित ट्रॅप मध्ये अडकतात . आणि एक समाज काहीही झालं तरी मुलींनाचं दोष देणार त्यांची बाजू समजून न घेता मुलींनाच गृहीत धरतो .


      मुळातच एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र मैत्रीण असू शकतात . ह्या विचाराने तिची आणि त्याची फ्रेंड शिप झाली . सोशल मीडिया वर रिअल मध्ये ते एकमेकांना ओळखत नव्हते . सुरुवातीपासून त्यांची मैत्री खूप छान होती .


समजून घेणं समजून सांगणं एकमेकांना वेळ देणं . ह्या गोष्टी मुळे त्यांची मैत्री बहरत गेली . तिचा त्याच्यावर खूप विश्वास बसू लागला . आणि त्याचा ही तिच्यावर . विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मैत्रीच हळू हळू प्रेमात रूपांतर व्हायला लागलं . पण ते प्रेमात होणार रूपांतर दोघांनाही मान्य नव्हत .


   कोनामध्येही विनाकारण अडकायच नाही . अशा विचारांचा तो होता . आणि तिला तर तिच्या आयुष्यात कोणावरही कधीच प्रेम करायचं नव्हत . 


ते त्यांच्या विचारांवर जरी ठाम असले , तरी यंग होते . त्यामुळे मनावर हवा तेवढा ताबा ठेवायला जमल नाही .


हळू हळू त्यांचं एक दीड तास होणार बोलणं . 3 ते 4 तासावर गेलं . आणि मग खरोखरच ते एकमेकांमध्ये गुंतू लागले  .. हळू हळू त्यांच्या बोलण्या त नको ते विषय निघू लागले . अर्थात त्या विषयाचा तिला खूप त्रास व्हायचा .


त्यांचं मन आपल्यामुळे दुखावल्या जाऊ नये . ह्या भावनेने ती त्याला रिस्पॉन्स द्यायची.  पण तिच्या मनात हळू हळू त्यांच्या बद्दल नको त्या शंका येऊ लागल्या .


" हा नक्की चांगला असेल ना , सोशल मीडिया वर कोणीही चांगलं वागत . रियल लाईफ मध्ये कसा असेल?"


अशा प्रकारे प्रश्न तिच्या मनात सतत येत होते . ती कधी कधी त्यांच्याशी बोलण टाळायची.  पण तिने बोलण टाळलं की तो खूप upset व्हायचा . आणि तो upset झाला की ती ही upset व्हायची . त्यांच्या आनंदासाठी त्याच्या समाधानासाठी ती त्याच्या contact मध्ये राहिली. 


त्याच्या गोड गोड बोलण्यात ती अडकत चालली होती .


त्याच्यात अडकतांना स्वतःला पूर्णपणे विसरत चालली होती . आता तर तिच्यासाठी तोच तीच आयुष्य झाला होता . "तिचं आयुष्य म्हणजे फक्त तो आणि तोच" अशी उपमा तिने दिली होती .


ऑनलाईन नातं त्यांचं खूप छान झालं . आपण एकमेकांना 4 - 5 महिन्यापासून नाही तर , जन्मापासून एकमेकांना ओळखत असल्याची फिलिंग त्यांना येत होती . 


असं एकमेकांना किती दिवस wp बघायचं . असं दोघांनाही वाटू लागल होत . दोघानाही एकमेकांना भेटण्याची खूप ओढ लागली . ती ओढ संपुष्टात आली .  ते काही दिवसांनी भेटले ही . आणि पहिल्याच भेटीत नको त्या घटना घडल्या .


ती   दोन तीन वेळेस नाही म्हणाली . पण नंतर त्याच्या प्रेमळ आणि फसव्या शब्दांनी तिला फसवल व्यवस्थित रित्या ट्रॅप मध्ये अडकवल आणि बिचारीचं आयुष्य उदवस्थ झालं ....
दुर्गा मते


अशा घटना घडू नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे . सोशल मीडिया वाटते तेवढी चांगली नाही . हे लक्षात ठेवूनच लोकांशी संपर्क साधला पाहिजे .

हा पण इथे खूप चांगली माणस भेटतात ती ही जपून ठेवली पाहिजे .

ही कथा पूर्णतः काल्पनिक होती कोणाच्याही आयुष्याशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ..


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...