मनातील डायरी चे पान ..
विषय - विविध रंगी मैत्री ....
देवाची भेट हृदयाशी थेट ..
असं एक खास नातं मैत्रीचं ..
बंध आपलुकीच ...
पावित्र्य जपत विणायचं ..
मैत्री एका पुरुषाची एका स्त्री शी असो किंवा ,
एका स्त्री ची एका पुरुषाशी असो ..
प्रोब्लेम कधीच आणि कुठेच नसतो ..
धागा मैत्रीचा तो मजबूत असतो ...
आज मी विविध रंगी मैत्री ह्या विषयावर लेख लिहिनार आहे . आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा . आणि जर नकळतपणे भावनेच्या भरात चुकन काही कमी जास्त झालं असेल तर , त्यासाठी सॉरी ...पुढच्या वेळेस चुका होणार नाही . ह्याची काटेकोरपणे काळजी घेतल्या जाईल .
विविध रंगी .. मैत्रीला कुंपण नसतं . तारुण्याचं , सौंदर्या च .. जाती - पातीच ..गरीब श्रीमंतिचं मैत्री हे नातं खूप खास आणि महत्वपूर्ण आहे . प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने दिलेलं एक सुंदर वरदान म्हणजे मैत्री हे नातं आहे.
रक्ताच नसेल पण हक्काचं मैत्री शिवाय दुसर नातं कोणतचं नसेल .
मग ते नातं एका स्त्रीचं एका पुरुषाशी असो किंवा , एका
पुरुषाचं एका स्त्री शी असो . मैत्री हे नातं लिंग बघून तयार होतं नाही . जिथं मन जुळतात . एकमेकांना समजून घेतल्या जात . मन मोकळं करण्यासाठी हक्काचं ठिकाण जी व्यक्ती वाटते . त्या व्यक्तीशी हे नातं जुळत .
मैत्री मध्ये वय ही नाही बघितल्या जातं . समोरचा आपल्या वयाचा आहे . की , आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे . ह्याचं कॅलक्युलेशन कोणी करत नाही . ज्या व्यक्तीशी आपण आपल्या मनातील हर एक गोष्ट फ्री ली बोलू शकतो . त्या व्यक्तीशी ते नातं नकळतपणे विणल्या जातं . आणि पुढे जाऊन - प्रेम , जिव्हाळा , आपुलकी , माया , ममता ह्या भावनेने त्या नात्याची गुंफण मजबूत होत जाते . ह्यात गैर असं काहीच नाही हे ती त्या नात्याची गरज असते . पूर्वी पेक्षा अजुनही strong आणि परफेक्ट होण तिची कॅटेगिरी असते .
एका गोष्टीचा खेद वाटतो आज एका मुलाने एका मुलीशी मैत्री केली आणि त्यांची पूर्वी पेक्षा अजुन फुलत गेली .अगदी पावित्र्य जपून तरीही सुसुक्षित लोकांना देखील ती मैत्री नाही . तर त्यांची काहीतरी भानगड वाटते . हा विचार खूप चुकीचा आहे . म्हणजे माझ्या तत्वात न बसणारा आहे .
" एक स्त्री आणि एक पुरुष - एक मुलगा आणि एक मुलगी खूप चांगले मित्र मैत्रीण असू शकतात नाही , तर ते एक चांगले मित्र मैत्रीण असतातच . "
हे तत्व मानणारी मी आहे . आणि हे तत्त्व माझं आहे . आणि त्यामध्ये कधीही बदल नाही होणार .
ज्या ठिकाणी सुख - दुःख अगदी हक्काने व्यक्त करता येतात . त्याठिकाणी काही चुकीचं आहे अस मला तरी वाटत नाही.
Infact मी तर म्हणेन ..
एका स्त्रीच्या आयुष्यात आवर जून एक मित्र असावा , आणि एका पुरुषाच्या आयुष्यात आवरजून एक मैत्रीण असावी . हा पण त्यांच्या तील ते मैत्रीचं बंध एकदम पवित्र हवं . कोणीही त्याच्यावर चिखल फेक करेन अस ते नको .
मैत्रीचं नातं खूप असतं ..
फक्त जपता यायला हवं ...
मला माहित मी चांगल्या प्रकारे लिहू शकले की नाही . पण माझ्या मनात मैत्री ह्या नात्याबद्दल अशा संकल्पना आहे ..
मी मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं मानते ..
Thankyou
खूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
ReplyDelete