नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 3, 2022

आयुष्य डिस्टर्ब होत ...

भावनेच्या भरात ह्या लेख मालिकेतील पहिला लेख माझा .

आयुष्य डिस्टर्ब होत.

खरोखरच भावनेच्या भरात प्रेमात पडल्या नंतर .. आपण खूप सारी स्वप्न रंगवतो . स्वप्नांना अस्तित्व आहे की , नाही ह्याची दखल न घेताच वाहवत जातो . आणि नंतर एकटो पडतो .

प्रेम वाईट नाही हे , जर अनुभवण्या पुरत असेल .
मनावर ताबा असेल तर ...जर आपल्या मनावरचा ताबा सुटला तर , मग खरोखरच खूप त्रास होतो . आणि त्याहूनही जास्त त्रास होतो . जीव लावलेल्या माणसाला बायचान्स सोडून जाण्याची गरज पडली तर , किंवा तो आपल्याला दुखवून गेला तर ..म्हणजेच विरह नशिबी आला तर , आणि प्रेम केलं म्हंटल्यावर 💯💯विरह येतो. 
प्रेमाची शिक्षाच ती आहे .

जेव्हा नशिबी विरह येतो . तेव्हा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो . हळव्या मनाला असंख्य वेदना झालेल्या असतात . त्या वेदनांच्या जखमा खोलवर रुजलेल्या असतात . तात्पुरत्या विझतात आठवणींच्या हिंदोळ्यावर पुन्हा नव्याने आठवतात . आणि मग खरोखर आयुष्य डिस्टर्ब होत . एक क्षण अस ही वाटायला लागतं .

का आला असेल हा आपल्या आयुष्यात आणि आपण तरी का ह्याला जीव लावल्याची चूक केली असेल . भावनांचा गुंता वाढत जातो . आणि खरोखर खूप त्रास होतो .

त्यामुळे वाहवत जाण्याआधी मनावर ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे.  अनुभव प्रत्येक गोष्टीचा घ्यायला हवा . पण त्या आधी हा अनुभव आपल्याला आयुष्यभर त्रास ही देऊ शकतो . ह्याचा ही जरा विचार करायला हवा .

हा लेख लिहिण्याचा एकमेव उद्देश ..आयुष्य डिस्टर्ब होत.


त्यामुळे जरा मनावर ताबा ठेवायला हवा.  जर आपण मनावर ताबा ठेवला नाही तर नुकसान दुसऱ्या - तिसऱ्या कोणाचं नाही होतं. आपलच होतं . जगासाठी नाही स्वतः साठी तरी मनावर ताबा असायलाच हवा .आणि मग कोणताही अनुभव घ्यावा नवा . 😊😊😊😊👍👍
दुर्गा मते


हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . तरीही नकळत कोणाचेही मन दुःखवल्या गेले असेल तर , चुकीस क्षमस्व : 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...