नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 24, 2022

कविता एक

कविता साज विचारांचा ..
कविता आरसा माझ्या मनाचा .
कविता संगम माझ्या सुख - दुःखाचा .

कविता पहाट माझ्या स्वप्नांची. 
कवीता हाक माझ्या हृदयाची ..
कविता सखी माझी जिवाभावाची ..

कविता एक मोकळा श्वास ..
 कधी कधी सत्य असूनही वाटे आभास .
छंद मला एकच खास ..
कविता लिहिण्याचाचं आहे ध्यास ..
दुर्गा मते

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे . जिच्यामुळे मला नवी ओळख मिळाली . माझं अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळाली . त्या माझ्या सर्वात खास मैत्रिणीचा आज दिवस आहे ..
कविता दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा ..💐💐💐

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...