नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 24, 2022

नशिबाने ठरवलेल्या गोष्टी मन स्वीकारत ..

दुःख मनाचे आज निकामी होताना बघतेय .
तरीही अजुनही सुखाची भीक मागतेय ...

सुवर्ण पाना वरचे अक्षर आज वाचतेय ...

भाळी लिहिलेल्या घटना रोज नव्याने पाहतेय...

स्वप्न माझे श्वासात भिनलेले रडले ..

काळ्याकुट्ट अंधारात जाऊन निपचित पडले ..

सुखाची बरसात होताना हसू चेहऱ्यावर फुलले ..

जे होते दुःख मी भोगलेले आज  भुलले ..

डाव सुखाचा उधळताना पुन्हा एकदा स्मरले .
आठवणीत रमताना मजला कोडे नवे पडले ..

जे मनास रुचले होते ..ते नशिबास नाही पचले ..
जे नशिबात होते ते मनाला न पटता ही त्याने स्विकारले
दुर्गा मते..

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...