नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 24, 2022

वीण ही असेल शेवटच्या क्षणापर्यंत

वीण ही असेल शेवटच्या श्वासापर्यंत ...
साथ ही असेल शेवटच्या क्षणापर्यंत ...

नातं हे विश्वासाचं जिवापाड जपणार ..
श्वासा - श्वासांच समीकरण  मी रचणार ..

दूर असून ही तू जवळ भासणार ..

मनात तुझ्याच विचारांचं किलबिलाट असणार .

.कृष्ण समान तू हृदयात वसलेला ..

जीव माझा अर्धा तुझ्यात सामावलेला ...


लग्न घटिका जवळ येता माझी ...

मजला शोधण्यास होरपळणाऱ नजर तुझी ..


जरी दिसले नाही मी तुला कुमारिका वेशभूषेत ..
हळदीच्या अंगाने आले तुझ्यासमोर तरी पाणी आणू नको डोळ्यांत ..


वीण ही असेल शेवटच्या क्षणापर्यंत ..
रेखाटून ठेव चित्र मनात शेवटच्या श्वासापर्यंत ..
दुर्गा मते

1 comment:

  1. WOW..!
    खूपच छान शब्द रचना 👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...