नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 27, 2022

गाठ सत जन्माची .

ही कथा मी एका स्पर्धेसाठी लिहीत आहे . वाचकांनी वाचून भरुभरून प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा ..

आज विनाला बघायला देशमुख घराण्यातील कुलदिपक सम्राट देशमुख येणार म्हणून लगबग सुरू होती . वीणा दिसायला सुंदर पण तब्येतीने जरा धष्ट पुष्ट सर्वांना चिंता ह्या मुलीला कोणी होकार देईल का ? ह्याची ...तिच्या ही मनात नेहमी हीच धास्ती असायची ..मला  होकार देणारा येईल ना माझ्या आयुष्यात ..कारण तिचं स्वप्न होतं.  जो मुलगा पहिल्यांदा बघायला येईल . त्यानेच मला होकार द्यावा . 

आज जो मुलगा तिला बघायला येणार आहे . तो तिच्या वडिलांचा खूप जवळचा मित्र असल्यामुळे नकाराची खूपच शक्यता होती . इंफॅक्ट तिच्या वडिलांनी तिला सांगितलच होतं . ह्याला तू 80 टक्के जरी पसंद नसली ना . तरी तो तुला होकार देईल .

बाबांच्या ह्या एका वाक्यावर तिने कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला होकार दिला ...

सम्राट देशमुख ...दिसायला अतिशय सुंदर . त्याच्या तुलनेत विना काहीचं नव्हती .

     10 च्या सुमारास मुलाकड चे तिला बघायला आले.  ती खूप छान रेडी झाली . तिला वाटायचं मी खूप जाड आहे.  पण साडीत ती नॉर्मल दिसत होती...


ही आपली विना आहे ह्याच्यावर कोणाचाच विश्वास बसनेसा झाला ..  तिच्या आईने गडबड सरबड तिची दृष्ट काढली . तेच तिचे बाबा तिला बोलावण्यासाठी आले .


" खूप गोड दिसतेय माझी परी राणी ! " विनाच्या कपाळावर नाजूक किस करत बाबाने तिचं कौतुक केलं .


बाबांनी केलेल्या गोड कौतुकावर तिने ही छान ओठी हास्य फुल वलं ...


ते तिला घेऊन समोरच्या दालनात गेले .


सम्राट ने तिच्या कडे बघून नाक मुरडल . कारण त्याने तिला मनामध्ये जस इमॅजिन केलं होतं . तशी ती बिलकुल नव्हती .


त्याच्या चेहऱ्याच्या हाव भावारून तिच्या लक्षात आलं होतं . की ह्याला आपण पसंद नाही . तिने मनातल्या मनातच खूप नाराज झाली . ह्याने जर आपल्याला नकार दिला तर पुन्हा कधीही लग्नाची स्वप्न रंगवायची नाही . ठरवून मोकळी झाली . 


कांदे पोह्याचा कार्य क्रम झाला.  मुलाने होकार दिला.  ती आश्चर्य चकित झाली . हे असं कसं झालं ? विचारात पडली .


घरातील सर्व मंडळी खुश झाली . आणि साखरपुडा ही कधी असेल हे लगेच जाहीर केलं . अजुन चार दिवसांनी करून टाकू साखरपुडा असं मोठ्या माणसांनी ठरवून टाकलं .


ठरलेल्या दिवशी साखरपुडा ही झाला . दोघेही खूप सुंदर दिसत होते . " मेड फॉर इच अदर " साखरपुडा ही झाला खूप सुंदर पोझ देऊन फोटोशूट पण झालं . पण एक गोष्ट विनाला खूपच खटकली .


आज सम्राट एक शब्द ही तिच्या बरोबर बोलले नव्हते . बोलायचं तर दूरचं साध त्यांनी तीच्याकडे बगितल ही नव्हत .


तिला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटलेलं असतं  . तिच्या मनात भलते सलते विचार येत असतात . ते विचार खूप त्रास दायक ठरले . तिचं मन आतून खूप तुटतं होतं .


मी ह्यांना पसंद तर नसेल ना ? सारखा हाच प्रश्न तिच्या मनात येतं होता . मजबुरीने ह्यांनी होकार दिला असेल का ? प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. 


तिच्या डोळ्यात अश्रू दाटलेले बघून तिचे जिजु ही हळवे झाले .


" काय झालं विना ? " रडतेस का ? " त्यांनी विचारलं


" जिजु " दाटलेले हुंदके फुटले . " त्यांना मी पसंद तर नसेल ना . त्यांनी मजबुरीने तर होकार दिला नसेल हा " ती मोठं मोठ्याने रडू लागली .


" तू शांत हो आधी . रडू नको .. असं काही नसेल मनातील गैरसमज काढून टाक .  " तिला शांत केल्यावर त्यांनी सम्राट ला कॉल केला . आणि मोबाईल विनाच्या हातात दिला . ते तिथून निघून गेले .


" हॅलो विना .कशी आहेस ? " सम्राट ..


" मस्त तुम्ही " विणा .


" मी पण छान " सम्राट


" तुम्हाला मी मनापासून पसंद आहे ना हो " विणा ने प्रश्न विचारला.


" हो तू मला पहिल्या भेटीत मनापासून आवडली होती . म्हणून मी होकार दिला . का काय झालं ? " सम्राट


" काही नाही " विणा .


" ओके ..एक लक्षात ठेव . पुन्हा डोळ्यात पाणी कधीचं आणायचं नाही . आता ही गाठ सत जन्माची बांधली गेली . आहे माझी तुझ्यासंग आणि तुझी माझ्यासंग .


" मग तुम्ही त्या दिवशी माझ्याशी बोलला का नाही " विणा.


" बोर झालो होतो मी ..आणि मेन म्हणजे तुझी मजा क घेत होतो.  " असं म्हणत ते हसायला लागले . आणि ती पण"  काय तुम्ही " अस म्हणत नाजूक लाजली .


" असाच आहे मी ..बोलू परत बाय "


असं म्हणत ते फोन ठेवतात . आणि विणा ही आनंदाने उड्या मारत मारत बेडरूम मध्ये जाते .
दुर्गा मते


कशी वाटली स्टोरी वाचून नक्की कळवा ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...