मीच माझ्या हुकुमाची राणी .
नाही मला कोणी वाली ..
जे मनास वाटते ..
ते मी करते ..
स्वच्छंदी आयुष्य जगते ...
क्षणात रागवते ..
क्षणात गोड होते ..
हळव्या मनाची भाषा मी ऐकते .
राणी मी हुकुमाची ..
मी माझी मलाच प्यारी ...
पूर्ण करते स्वप्न मीच माझी सारी ....
राणी मी हूकुमाची ..
परिभाषा जाणते स्वअस्तित्वाची .
मशाल पेटले कर्तुत्वाची ...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.