नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 29, 2022

जादूगार मी नव्या दमाचा ...

जादू गार मी नव्या दमाचा कवी मनाचा ..
रचनेत इतिहास घडवी सुख - दुःखाचा ..

वेड मला प्रचंड वाचण्याचे ....
वाचता वाचता शिकते मी सूत्र जगण्याचे ..

नभातील चांदणी बघता होई खुश मन ..

रचनेत स्वतः ला चांदणी ची उपमा देत जगते एक क्षण ..

जादूगार मी साहित्य निर्मिती तील छोटासा भाग ...

मोठा कवी - लेखक होता येणार नाही मला  ..नाही ह्याचा राग.....

आनंद ह्याचाच मजला अपार ...

कल्पनेत प्रत्येक रूप घेऊन होता येते मजला  साकार

कल्पनेत जत्रा भरवतो हळव्या क्षणांची ...
आवड आहे हो मला लिखाणाची ....
जादू आहे माझ्याकडे कल्पना करण्याची ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...