नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 2, 2022

आसवांना आला पुर .

आसवांना आला पुर ,
गेला तू सोडून दूर...

विरहाच्या जखमा खोलवर रुजल्या ,
ज्या एकेकाळी तूच होत्या रे पुसल्या ..

हळवे माझे मन ,
दुबळे झाले रे तन ..
दिले तू इतके दुःख.  
आस होती मला ,
दुखः हूनही जास्ती देशील सुख. 

आस ही पुरात वाहून गेली ..
आनंदाची होडी माझी मला सोडून गेली ..
विरहाची जखम तू दिली ..
कोलमडून गेली प्रेम कळी ..

आसवांना आला पुर ,
गेला तू सोडून दूर ..

वणवे पेटले भवताली संशयाचे ..
धुके विरले सारे प्रेमाचे ..
नाही राहिले नाते जन्मोजन्मी चे ...

स्वप्न पाहिली बाबड्या मनाने ...

गेलास निघून स्वार्थीपणा ने ...

झाले मी सावध तू दिलेल्या विरहाने ....

तरीही का कुणास ठाऊक ..
आसवांना आला पुर ..
तू सोडून गेला दूर .
दुर्गा मते...

1 comment:

  1. अतिशय सुंदर रचना ✍️👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...