नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 1, 2022

सुखाचे चांदने

आज खर्या अर्थाने जगण्याची रीत कळतेय . अनुभव घेत चालले ना , तशी हळू हळू शिकतेय . खूप कमी  वयात खूप अनुभव आले . प्रत्येक  नव्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकले . आणि आज खऱ्या अर्थाने सुखाचे चांदणे गवसले ...

आता समाजाची रीत खूप चांगल्या प्रकारे कळली . माणसाचे स्वभाव खूप चांगले प्रकारे समजले . साधा आणि बिनधास्त स्वभाव असल्यामुळे अनेकदा फसले गेली . तरीही पुन्हा खड्यात पडली . 😜😜आणि ते पडण काही सोडणार नाही . 😜😜कारण त्याच्या शिवाय मी काही शिकणार नाही . असो ..

अनुभावाच्या आगीत होरपळले ..
आता कुठे सुखाचे चांदणे गवसले ...
लोकांच्या मनातील द्वंद्व कधी ना समजले ..
कशी त्याच्या जाळ्यात अडकले ..
माझे मलाच नाही कळले ...

फिरून फिरून पुन्हा तेच ..

नवे जुने अनुभव आले ...


त्या अनुभवानंतर आज सुखाचे चांदणे गवसले ...


जखमा खोलवर रुजलेल्या ....


शहाण्या करू लागल्या ...


आता तरी भानावर ये , सतत सांगू लागल्या ..


हा लेख म्हणजे माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात आहे . ही सुरुवात माझ्या अनेक चांगल्या - वाईट अनुभवांची साक्ष देते . आज मी माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करतेय .


आणि त्यात प्रेम आणि मुलांशी फ्रेंडशिप ह्या गोष्टीला बिलुकल महत्व नाही हे , कारण कुठल्या ही पुरुषाशी मैत्री करावी असा पुरुष कलियुगात जन्माला नाही आला . कुठलाही पुरुष असो , सुरुवातीला खूप चांगला वाटतो . अगदी ह्याच्या सारखा पुरुष शोधून ही सापडणार नाही असं ही वाटतं.  पण ते नकळत्या वयात खूप गोड गैरसमज असतात . आणि ते वेळीच दूर होणं खरोखर खूप गरजेचं असतं . नाहीतर खूप प्रोब्लेम होतात .


आयुष्य ही बरबाद होतं . त्यामुळे खरच आपण जर कुठल्याही विषयात भरकटत चाललो असेल ना , तर वेळीच थांबावं.  कुठेतरी स्वतः ला थांबवावं . पुढे जाण्यापेक्षा थांबन योग्य असतं . कारण पुढे जाऊन किती धोका असेल हे , आपण नाही सांगू शकत . म्हणून वेळेवर थांबन केव्हाही योग्य .


आणि मी ही आज हेच केलं .. म्हणजे तस विशेष काही नव्हत . प्रेम तर नव्हतच फक्त एक चांगली मैत्री होती .


पण मला ती वेगळ्याच वळणावर जाताना मला दिसत होती . म्हणून मी थांबले . हा चुकीच्या पद्धतीने थांबले .  पण थांबायचं चं होतं . पुढे जाण्यासाठी मन कधीच तयार होणार नव्हत . म्हणून मी वेळीच सर्व काही थांबवलं आणि नव्याने सुख शोधण्याचा प्रयत्न करते.  माझ्या आवडीच्या विषयात . आणि अभ्यासात. 

आता खऱ्या अर्थाने सुखाचे चांदणे गवसले ..
कळीतून एक नाजूक फुल उमलले ..
कांट्याच्या वेदना झेलत झेलत strong झाले ..
आता कुठे सुखाचे चांदणे गवसले ..
दुर्गा मते


2 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...