नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 15, 2022

यशस्वी जीवन होईल ...

जीवन हे खूप सुंदर आहे . फक्त त्याच्याकडे बघन्याचा दृष्टिकोन नकारात्मक नको सकारात्मक हवा .

खूप स्टेशन ह्या जीवनात येत असतात . कुठल्याच स्टेशनवर आपण कायम स्वरुपी स्थिर राहण्यासाठी उतरत नसतो . ज्या ही स्टेशन वर आपण उतरणार असतो . त्या स्टेशनचा निरोप घ्यावाचं लागेल . हे मनात रुजवूनचं स्टेशन वर उतरायच असतं .

आवडीच स्टेशन होतं माझ सोडून जायचं नव्हत. पण नियतीने चक्र फिरवलं . आणि जावं लागलं . कितीही रडले . ओरडले . ह्या स्टेशन  वरचा प्रवास अजुन रोमांचक व्हावा म्हणून हट्ट धरला. ऐकणा र्याने ऐकला पण तो पुरवलाच नाही . Infact हट्ट पुरणाऱ्या कडेही हट्ट पुरवण्याचे ऑप्शन बाकी नव्हते .कारण त्यानेही त्याच्या मनाची समजूत घातली होती . ज्या स्टेशन वर आपण उतरतो त्या स्टेशन वर थांबून रहायचं नसतं . त्या पुढे जाऊन त्याच्याही पुढचं स्टेशन बघायचं असतं . म्हणून प्रवास नावाचं चक्र चालूच ठेवा यचं असतं .


ज्याने समजूत घातली होती , ज्याच्याकडे हट्ट पुरवला होता . त्याच नाव होतं मन आणि जीवन आणि बुद्धी .


असाच विचार आणि अशीच समजूत मानवी जीवनात अनु प्रमाणे वावरत असलेला माणूस आणि त्याच्या मनाने त्याच्या बुध्दीने घातली तर , प्रत्येक मानवाचं जीवन यशस्वी होईल .


जे मिळालं नाही त्याच्यासाठी शोक करत बसायचं नाही . जे मिळालं नाही . त्याचा विचार करण सोडून द्यायचं .


ह्याच्याही पेक्षा काहीतरी खास मिळेल ह्या आशेवर जगायचं . म्हणजे हातातून निसटून गेलेल्या गोष्टीचा दुःख वाटतं नाही .


आणि महत्वाचं म्हणजे कितीही दुःख येवो कितीही संकट येवो हार मानायची नाही . आठवणींच्या कॅमेऱ्यात कैद व्हायचं नाही . ज्या स्टेशन वरचा प्रवास संपला त्या स्टेशन वर पुन्हा परत यायचं नाही . तर त्या पुढची हजार स्टेशन बघण्याची जिद्द ठेवायची. आयुष्य किचकट होतं नाही .


जगणं सुंदर होतं . यशाचे दरवाजे आपल्यासाठी ओपन व्हायला लागतात . आणि हळू हळू आपलं जीवन यशस्वी होण्याच्या मार्गावर स्थिर व्हायला लागतं .
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...