मनातील डायरी चे पान विषय अंतर्गत ...
लग्न एक प्रथा ...
आयुष्याची नवी सुरुवात ...
वयात आलेल्या मुला मुलींच स्वप्न ...विशेष करून लग्न आणि त्याला अनुसरून विविध स्वप्न म्हणजे माझा लाईफ पार्टनर असा तसा असावा . सुख दुःखात साथ देणारा असावा . माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारा असावा. सावली बनुन प्रत्येक क्षणी माझी साथ देणारा असावा. वगैरे वगैरे वैगरे ....अशी विविध स्वप्न डोळ्यात साठवून खऱ्या आयुष्याची सुरुवात करणारी प्रथा म्हणजे लग्न ...
पण त्यापूर्वी जेव्हा एक मुलगा एका मुलीला बघायला येतो . किंवा त्याही पूर्वी म्हणजे लग्नाचा विषय घरात निघतो. तेव्हा एका मुलीच्या मनाची काय ? परिस्थिती असते. ती परिस्थिती मी एका कथे द्वारे इथे मांडणार आहे ........
अनघा नुकतीच वयात आलेली मुलगी दिसायला गोड . स्वभावाने हळवी छोट्या छोट्या कारणावरून रडणारी . सतत हसतमुख चेहऱ्याने वावरणारी . तिचा गुमसुम असलेला चेहरा कोणालाही बघायला आवडत नसे . आणि ती सतत ही हसतच रहायची . त्यामुळे कोणावरही तिचा गुमसुम असलेला चेहरा बघण्याची वेळ आली नाही .
" ऐकल का ? आपल्या अनु साठी खूप छान स्थळ आलं आहे . हा बघ फोटो . " अनघाचे वडील बाहेरून घरात येत असतानाच बोलत बोलत आले . आणि किचन मध्ये आल्यानंतर मोबाईल फोन मधील अनघाला जो मुलगा बघायला येणार होता . त्याचा फोटो ते अनघाच्या आईला दाखवत असताना बाहेर गेलेली अनघा ही घरी आली . आणि तिच्या बाबांनी तिच्या आई बरोबर तिला ही त्या मुलाचा फोटो दाखवला .
" काय मग अनु मॅडम कसा आहे . माझा जावई ? "
अनघा चे बाबा तिच्या कडे बघत बघत तिला हसत हसत तिला विचारू लागले . जणू ते तिचे म जाक घेत होते .
अनघा फोटो बघून शॉक. काय बोलावं तिला सुचत नव्हतं . तो मुलगा दिसायला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी होता . तिच्या पेक्षा कित्येक पट्टीनी सुंदर त्यामुळे तिला काय बोलावं तेच सुचेना .
" बापू ...दिसायला तर सुंदर आहे. हा पण तुम्ही नका बोलवू ह्यांना मला बघायला .." असं बोलून ती अवाऱ्यात गुपचाप निघून गेली .
" आता हिला काय झालं ? एरवी तर म्हणत असते. प्रॉपर्टी थोडी कमी असली तरीही चालेल . पण मला शोभणारा मुलगा हवा . आता एवढा सुंदर मुलगा आहे . तरी मॅडम गेल्या रूसून ..तुम्ही ना खूप लाडावून ठेवलं हिला . अती लाड करता तुम्ही हिचे ." असं म्हणत तिची आई किचन मध्ये असणारे भांडे जोरजोरात आपटत होती .
अनघा चे बाबा काहीचं न बोलता अनंघा कडे गेले .
" अनु , बाळा , ..काय झालं ? तुला मुलगा आवडला नाही का ? " ते तिच्या जवळ जाऊन तिला प्रेमाने विचारू लागले .
" नाही बापू , असं काही नाही .." अनु बाहेरच्या दिशेने असणाऱ्या जास्वंदीच्या फुल झाडाकडे एकटक बघत बोलली .
" अनु , इकडे बघ माझ्याकडे आणि मला नीट सांग बाळा काय प्रॉब्लेम आहे ? " बापू ..
" बापू तो मुलगा मला पसंद नाही करणार . आणि चार चौघात मला एका मुलाने नकार दिला ही गोष्ट मला नाही रुचणार . म्हणून नका बोलू त्याला
बापू तिच्या बोलण्यावर आणि निरागसतेवर हसायला लागले . " एवढंच का ? बघू ते उद्या ..होकार देतो की नकार .
" नको ना बापू " अनघा एवढासा चेहरा करून बोलली .
" तू आता निवांत झोप बरं ..मी त्यांना सांगितलेलं आहे . ग उद्या या म्हणून आणि आता ऐन वेळेवर नाही सांगितल
तर चांगलं वाटणार नाही ते . मन दुखावल्या जाईल त्यांचं ." असं म्हणत ते तिला समजावू लागले ..
" आणि उद्या जर त्यांनी मला चार चौघात नकार दिला तर माझं किती मन दुखावल्या जाईल . ह्याचा विचार केला तुम्ही ? " अनघा चे डोळे भरून आले होते .
" काळजी नको करू बाळा . तो नाही देणार तुला नकार "
" तुम्हाला इतकी कशी खात्री ? " अनघा ..
" आणि तुला इतकी कशी खात्री ग ..? की तो तुला नकारच देईल .." बापू
" बापू , अहो मी बघा तो बघा माझ्या पेक्षा कित्येक पट्टी त सुंदर आहे. तो दिसायला मला कसा होकार देईल . " अनघा ..
" अगं ! बाळा , असं काही नसतं . नशिबाचे भाग असतात . छान दिसण . एकमेकांना सुट होण . हे मनाचे खेळ असतात . " तिचे वडील तिला समजावत होते .
आता ती काहीच बोलू शकत नव्हती. ती शांतच राहिली .
" बरं तू झोप आता . मी पण झोपतो खूप उशीर झाला "
ते झोपायला गेले आणि ती ही झोपायला निघाली .
तस्वीर देखकर
यूहीं दिल आया आपपर ।।
फिर भी दिल में ,
घबराहट है ।
आप मुझे पसंद करेंगे ।
या नहीं । ।
आप मेरी जिंदगी बनेंगे ।
या नहीं ।।
आप है ना ।
मेरे किस्मत में ।।
कल होनेवाली मुलाकत ।
होंगी ना अगले सात जन्म तक ।।
बाप्पा प्लीज उद्या जो मुलगा मला बघायला येणार आहे. ना त्याने प्लीज होकार च देऊ दे . अशी प्रार्थना बाप्पाला करून ती झोपली .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उजाडली पहाट नवी .
आजची पहाट करेल तिच्या आयुष्याची सुरुवात खरी .
लग्न एक प्रथा ती पार करणार ..
तिच्या लग्नाची सुपारी नक्की फुटणार .
असं म्हणत तिचे बाबा तिला उठवायला आले .
" बाबा किती सुंदर बोललात तुम्ही . परत बोला ना प्लीज . " अनु हट्ट करू लागली .
" आता उशीर होईल. नंतर बोलेल . तू आवर लवकर . खूप छान रेडी हो . ह्या बापाची लाडकी राजकुमारी वाटली पाहिजे . "
" ओके बापू .." ती बापूला घट्ट मिठी मारते .
10 साडे 10 च्या सुमारास ते पाहुणे तिला बघण्यासाठी येतात . ती खरोखर खूप सुंदर दिसत होती . कुठलाही राजकुमार तिला सहज पसंद करेल एवढी सुंदर .
ती किचन मधून समोर चहा घेऊन आली . तिने सर्वांना चहा दिला आणि तिच्या राजकुमाराला ही द्यायला लागली . तो राजकुमार तिच्याकडे बघतच राहिला . सगळ्याच लक्ष त्याने वेधून घेतलं.
" मुलगी पसंद आहे ..त्याने सगळ्यांसमोर जाहीर केलं ."
तिच्याही जीवात जीव आला . पहिल्याच नजरेत त्याने तिला पसंद केलं . ही तिच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती . लग्नाची सुपारी पक्की फुटली होती . लग्नाची बोलणी करून पाहुणे मंडळी परतीच्या प्रवासाला निघाले .
त्यांनी वाटू लावून अनघा चे बाबा घरात आले .
" काय मग अनु झालं ना मनासारखं .." अस बापू ने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला .
" हो बापू .. खरचं मनासारखं झालं . बापू मी असो . किंवा अजुन दुसरी कुठलीही मुलगी असो . प्रत्येक मुलीची एकच इच्छा असते . की जो मुलगा मला फर्स्ट टाईम बघायला येईल ना . त्यानेच मला होकार द्यावा .
आणि माझी ही तिचं इच्छा पूर्ण झाली . " थँक्यू बाप्पा 🙏🙏 थँक्यु बाप्पू .
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.