आपण बऱ्याचदा ऐकतो की एक स्त्रीचं एका स्त्रीला चांगलं समजून घेऊ शकते . तिला मानसिक आधार देऊ शकते. पण मी आजच्या ह्या लेखा मध्ये स्त्रीचीचं एक दुसरी बाजू सांगणार आहे ..
आहे मान्य मला एक स्त्रीचं एका स्त्रीला चांगलं समजावून घेऊ शकते पण ; एका स्त्रीला बरबाद करण्याचं कारण देखील स्त्री असते... हे एक निर्विवाद सत्य ..
पुरुष कधीच एखाद्या बाईला किंवा मुलीला डायरेक्ट वाईट साईट बोलत नाही. पण एक स्त्री असते. जी समोरची एक बाई आहे हा विचार न करता तिला वाट्टेल तस बोलते .
खरं सांगायचं म्हटलं ना जेव्हा जी स्त्री सर्वांच्या मनात चांगली असते आणि तेव्हा तिचं स्त्री सर्वांच्या मनातून उतरते .
ना तेव्हा एक चांगली स्त्रीचं तिला सर्वात जास्त नाव ठेवत असते. ऊन धून बोलत असते. समोरची देखील एक स्त्रीचं आहे. हा विचार न करता . तेव्हा खूप वाईट वाटतं की आपण ही एक स्त्रीचं आहोत ह्याच...
हा लेख लिहून मला स्त्री जातीचा अपमान नाही करायचा .
पण हे एक निर्विवाद सत्य आहे . पडद्या मागचं जो पडदा सहजा सहजी कोणीही बघत नाही .
उदाहरण द्यायचं आहे म्हणून सांगते ...
जेव्हा वयात आलेली मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते
तेव्हा एक स्त्रीचं तिला फुस लावत असते. आणि तेव्हा त्याचं प्रेमात पडलेल्या मुलीचं प्रकरण गावात गाजतं
तेव्हा फुस लावलेली ती स्त्रीचं तिला सर्वात जास्त नावं ठेवत असते. म्हणून ठाम पने सांगते .
एका स्त्रीचं आयुष्य एक स्त्रीचं सर्वात जास्त बरबाद करत असते ..
दुर्गा मते
©®
No comments:
Post a Comment
Comments plz.