नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 7, 2021

माणूस म्हणून जगताना ...

माणूस म्हणून जगताना ,
किती भोगाव्या लागतात मरण यातना ...

पांघरावे लागतात ,
वेगवेगळे रूप ,
तरच येते जगण्याला हुरूप ...

कधी कधी मातीचा ओलावा ,
व्हावं लागतं ,
कधी कधी दगडाची कठोरता ,
व्हावं लागतं ...
कधी कधी रातराणीचा सुगंध ही ,
व्हावं लागतं ...
तरच जीवन हे उजळून निघत ...

माणूस म्हणून जगताना ,
खाच खळग्यांशी मैत्री करावी लागते ,
वेदना ही हसून झेलावी लागते ...
उरातील माया कधी कधी ,
आटवावी ही लागते ...
तरच जीवन हे बहरते ...
सुख हे जीवनी अंकुरते ...

4 comments:

  1. अप्रतिम शब्द रचना.. खूपच छान पिल्लू ..👌👍✍️🍫✍️👏👏👏🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. खुपच छान अप्रतिम

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...