किती भोगाव्या लागतात मरण यातना ...
पांघरावे लागतात ,
वेगवेगळे रूप ,
तरच येते जगण्याला हुरूप ...
कधी कधी मातीचा ओलावा ,
व्हावं लागतं ,
कधी कधी दगडाची कठोरता ,
व्हावं लागतं ...
कधी कधी रातराणीचा सुगंध ही ,
व्हावं लागतं ...
तरच जीवन हे उजळून निघत ...
माणूस म्हणून जगताना ,
खाच खळग्यांशी मैत्री करावी लागते ,
वेदना ही हसून झेलावी लागते ...
उरातील माया कधी कधी ,
आटवावी ही लागते ...
तरच जीवन हे बहरते ...
सुख हे जीवनी अंकुरते ...
अप्रतिम शब्द रचना.. खूपच छान पिल्लू ..👌👍✍️🍫✍️👏👏👏🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteखुपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखुपच छान अप्रतिम
ReplyDelete