नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 2, 2021

सांग सख्या ....

स्वप्न हे प्रितीचे ,
कशी रंगवू आज नव्याने ...
कोण देईल रे साथ मला ...
सांग सख्या ...

तू जिवापाड करतोस ,
सोनेरी स्वप्न मला दाखवतोस ,
तुझ्या ओठात सारखं ,
 माझच नावं गुणगुणतोस ...
तुझ्या गुण गुणन्यात ,
कोण सामील होऊ देईल मला ...
सांग सख्या ...

सप्तपदी आपण चालायचे ,
माझ्या नावापुढे मी तुझे नाव जोडायचे ,
सौभाग्याचे लेणे परिधान करायचे ,
पण कन्यादानाचे पांग कोणी फेडायचे ..
सांग सख्या ....सांग सख्या ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...