नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 3, 2021

मनाची पेटलेली चीता काही वीझेना ..

बेईमान झाल्या ह्या भावना ,
दखल त्यांची घेता येईना ,
आसवे वाऱ्यावर पडली ,
जिवांपणीच चीता मनाची पेटली ,
ती विझवायला ही कोणी येईना ....

हुंदके उरात दाटले ,
सभोवतालचे माणसेही बेईमान झाले ,
वाऱ्यावर पडलेली आसवे ही कोणी झेलेना ,
हुंदक्यांचा आवाज ही कोणी ऐकेना ,
पेटलेल्या मनाची चीता काही केल्या विझेना ...

तलाव नयनांचे आटले ,
मी एकांताचे शिखर गाठले ,
मनाची पेटलेली चीता मी विझवू शकत नाही ,
पण ती चीता विझवण्याचा अधिकार सोडणार नाही ..

ही केवळ एक काल्पनिक रचना आहे . मी जर कधी चुकून रडले ना तर माझे बाबा माझ्या चेहऱ्यावर हसू येईपर्यंत मला विचारतात काय झालं का रडतेस .
आणि एकांतात मी राहूच शकत नाही . कारण माझ्या घरी एवढी चिल्लर पार्टी असते त्यांच्यात मी पण मिसळून जाते . एकटी राहण्याची मला सवयच नाही ..
जिथे जाईल तिथे त्यांची होईल ओळख पाळख काही लागत नाही मला त्यामुळेच सर्वांना आवडते .. 

1 comment:

  1. अतिशय सुंदर..👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...