नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 4, 2021

प्रेम बंधन - 15

शेखर आणि नित्या लग्न  ह्या पवित्र बंधनात कायमचे अडकले होते . एकमेकांसाठीच त्यांचे आयुष्य सजले होते ...हृदयात खूप सारे स्वप्न माखले होते ....
सप्तपदी चालले आणि एका सुंदर बॉण्ड निर्माण झाला .

राहुल ही ठरल्या प्रमाणे त्यांच्या सोबत त्यांच्या नव्या घरी गेला . नव्या घरी म्हणजेच नित्याची सासरी ...दोघांना हि  कळेना शेखर ने आपली बाजू का घेतली . आणि परत आमच्यासोबत येण्याचा हट्ठहास अगदी गोंधळून गेले होते दोघेही .....

पाठवणी झाली ...

लाडकी लेक ती सासरी गेली ,
बाबाला गहिवरून आले ..
कन्यादानाचे पांग आज फिटले ..
आयुष्याचे ह्या सार्थक झाले ..

परायाची लेक पराया गेली ,
घराची जणू शोभाच गेली 

अगंणी फुललेलं फुल ते ,
सोनपावलांनी चालून आलेलं ...
एक निरागस स्वप्न ,

 ह्या निसर्गाने जन्मतःच तिच्यात रुजवलेल ..
परायाच धन होण्याचं वरदान तिला लाभलेलं ..

लेक चालली सासरी ,
बाबांची अलिप्त झाली बासरी ...
पावनी म्हणून दोन दिवस येणार माहेरी ...
एवढंच नातं आता बाप लेकीच ...
कस बरं आपल्या श्वासालाच पावनी म्हणायचं ...
बापाला काही सुचेना ,
लेक चालली सासरी ,
अलिप्त झाली बाबांची बासरी ..

लेक सासरी जाताना बाबा आतून तुटत होता ...
नित्या आणि तिच्या बाबांचं प्रेम पाहून राहुलच्या डोळ्यात नकळत पाणी आलं होतं . आणि शेखर पण खूप हळवा झाला होता . 

लेकीला निरोप दिला होता . राहुल पण त्यांच्या सोबत जाणार होता . नित्या च्या सासरी खूप सुंदर वातावरण होतं . सगळीच माणसं फ्री होती . राहुल आणि नित्याला सहज त्यांनी आपलस केलं होतं . 

राहुल आणि नित्याच्या अजुनही एक गोष्ट लक्षात येतच नव्हती . शेखर ने आपल्या मदत कशी काय केली ? आणि का केली असेल . 
दुसऱ्या दिवशी ते देवदर्शनासाठी जातात . तेव्हा शेखर राहुल लाही तू सोबत ये . म्हणून कंविन्स करतो . राहुल काय करावं सुचेना पण नित्या त्याला डोळ्याने च इशारा करत होती . चल म्हणून त्यामुळे त्याला सोबत जाणं भाग पडलं . 

ते देवदर्शनासाठी खूप दूर कोल्हापूरच्या महालक्ष्मी जाणार होते . राहुलला ही आता घरी परतायचं होतं . त्यामुळे त्याच्यासाठी ही सोपं झालं होतं . 
कोल्हापूर ला गेल्यावर ते ..( हॉटेल ब्रीज ) काल्पनिक नाव ...
ह्या ठिकाणी थांबतात . शेखर आणि नित्यासाठी एक रूम आणि राहुल साठी दुसरी एक स्पेशल रूम ..ते फ्रेश वैगरे होऊन सोबत बाहेर पडतात . राहुल कोल्हापूरचा असल्यामुळे त्याला कोल्हापूरची खडानखडा माहिती असते . तो त्यांना महालक्ष्मी च्या मंदिरात घेऊन गेला . तिथल्या संस्कृती ची माहिती त्यांना सांगू लागला . महालक्ष्मी च्या मंदिरं तर दाखवलेच , पण इतरही अनेक छोटे मोठे मंदिर दाखवले . त्या मंदिराची देखील अगदी खडानखडा माहिती सांगितली .
शेवटच्या स्थळ बघायला जेव्हा ते गेले तेव्हा शेखर राहुल ला डायरेक्ट बोलला . 
" आता तुझ घर कधी दाखवणार ? केव्हाच लहर आली आहे मला तुझ घर बघण्याची .."
शेखर च्या अशा बोलण्यावर राहुल अचंबित झाला . 
   " माझं घर "
" हो तुझच घर ...कोल्हापूरमध्ये च राहतो ना तू , माझ्या बायकोचा मित्र आहेस ना . "
राहुलला काय बोलावं सुचतच नव्हत . 
फक्त तो एवढच बोलू शकला . माझं घर ना नक्की दाखवतो . "
राहुल च्या मनाची अवस्था नित्याला सहज कळली होती.
ती त्याच्याजवळ जाते . त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत त्याच्याशी संवाद साधते .  
" काय झालं मित्रा ? कसला विचार करतोस ? "
" काही नाही . "
" मग अचानक डिस्टर्ब का झालास ? "
" डिस्टर्ब कुठे ? "
" डोळ्यात तुझ्या बघताच ,
मन तुझे जाणु शकते ,
मनातले भाव ओळखू शकते ,
नाते आहे आपले हक्काचे ..
निरागस मैत्रीचे " 

तो आता खूप भाऊक झाला होता . नित्याने त्याला काहीच सांगितल नाही . शेखरच पुढे येऊन त्याच्याशी अगदी त्याचा जवळचा मित्र असल्यासारखं बोलू लागला.
" राहुल यार मित्रा तू खूप लकी आहेस . तुला नित्यासारखी मैत्रीण मिळाली . तू जितका लकी आहेस ना तितका मी पण नाही यार . मी तिचा नवर
 आहे . समाजाने  आम्हाला नात्यात बांधलं पण ; तुम्हाला तर नशिबाने मैत्रीच्या नात्यात बांधलं . तू किती  लकी आहेस ह्याची तुला कल्पना पण नाही . "

राहुल निशब्द होऊन , " म्हणजे "

" म्हणजे , आजकाल एवढी चांगली फ्रेंडशिप नसते . कुठल्याच मुलीला लग्नानंतर तिचा मित्र तिच्या आयुष्यात हवा असं वाटतं नाही . आणि वाटलं तरी ती तिच्या नवऱ्याला कधीही सांगत नाही की मला एक जिवाभावाचा मित्र आहे . यार पण तू तर लईच नशीब काढलं .  नित्याने लग्न ठरल्यानंतर दोनच दिवसात मला तुझ्याबद्दल सगळ खर खर सांगितल . तिला तुझ्याशी असलेली मैत्री कधीही तोडायची नाही . हे ही तिने मला अगदी स्पष्ट सांगितल होत . माझ्या आयुष्यात तुम्ही आत्ता आत्ता आलात , राहुल खूप दिवसापासून माझा एक चांगला जिवाभावाचा मित्र आहे . आणि तो मित्र मला कधीही गमवायचा  नाही . जस त्याला गमवायच नाही , तसाच तुमचा विश्वास ही तोडायचा नाही . जितका तो महत्वाचा आहे . तितकेच तुम्ही पण महत्वाचे आहात.
तो मित्र आहे तर , तुम्ही माझे आयुष्य असणार आहात .
मला त्याला गमवण्याचा आणि ह्या आयुष्याला फसवण्याचा काहीही अधिकार नाही . असं म्हणत तिने मला लग्नाआधीच सार खर खर सांगितल . तुमची निखळ मैत्री तोडण्याचा मला अधिकार नाही . तुमची मैत्री माझ्यामुळे कधीही तुटणार नाही . हा माझा शब्द . "

शेखरच्या अश्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता  . नित्या आणि राहुलचा कारण जगात असा एकही मुलगा नाही , की ज्या मुलाला आपल्या बायकोला मित्र असलेला चालतो . पण नित्याने तेवढ्या बाबतीत नक्कीच नशीब काढलं होतं . 
तिला खूप समजूतदार जिवन साथी मिळाला होता . 
त्याच्या मैत्रीला स्विकारणार त्याचबरोबर तिच्या वर जीवापाड प्रेम करणारा . 

ते तिघेही खूप भाऊक होतात . नित्या पुन्हा त्याचा जवळ जाऊन त्याला बोलते , " मित्रा नको एवढं भाऊक होऊस मी माझ्या आयुष्यात जी जागा तुला दिली आहे , ती जागा कधीच कोणालाही देऊ शकत नाही.  अगदी शेखरला ही नाही . आणि शेखरचे स्थान ही तुला कधीही देऊ शकत नाही . प्रत्येक माणसाची आपल्या आयुष्यात एक पर्सनल स्पेस असते . जी प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. ती ठरलेली असते . आणि ज्याची स्पेस ज्याची त्याला द्यायलाच पाहिजे . असं मला मनापासून वाटतं .

" बास झालं फिल्मी ड्रामा , आता चल , ना राहुल तुझ्याघ री उत्सुक आहे मी तुझ घर बघण्यासाठी . " असं म्हणत शेखर वातवरण कलेक्ट करतो . आणि विषय बदलतो . 

राहुल ही त्या दोघांना आपल्या घरी घेऊन जातो . 
रीदिमा च आज शुटींग नसल्यामुळे ती घरीच असते . ह्या दोघांनाही ती ओळखत नसल्यामुळे ते घरात पाऊल टेकत नाही तर , रिदिमा राहुल ला विचारते . 
" कोण आहेत unknown gest "
" मित्र मैत्रीण आहेत माझे "
" हो का ? दोन दिवस तीन दिवस कुठे गायब होता ? "
ती समोर पाहुणे आहेत ह्याचा विचार न करता च तावातावाने बोलत होती . राहुल ला तर uncomfartebal वाटत होतच पण त्या दोघांनाही खूप वाईट वाटतं होतं.  उगाच आपण इथे आलो असं झालं होतं.  पण ते त्यांचे हावभाव ही साधे त्या ला दिसू देत नाही . 

तेवढ्यात नित्या समोर येते आणि रिदिमाशी मैत्री करण्याचा एक छोटासा प्रयत्न करते .

" Hi रिदिमा ! How are you ? "
" I am ok ! "
असं म्हणत ती तीला रिप्लाय देते . 
" फ्रेंड्स " असं म्हणत नित्या तिचा एक हात सेकंड करण्यासाठी पुढे करते.  पण रिदिमा मात्र रिस्पॉन्स न देताच आपल्या रूममध्ये निघून जाते . 
तिचं असं वागणं राहुल ला खूप खटकल होतं . पण तसे हा वं - भाव त्याने चेहऱ्यावर दिसू नं दिले नाही ..

" काय मित्रा घरी बोलवलस आणि साधा चहा पाणी पण नाही . असं कुठे असतं का ? "

" ये थांब , चहा करतोय की , बसा तुम्ही मी आलोच " असं म्हणत तो किचनमध्ये जातो . 
" आई कुठे आहे ? " असं म्हणत नित्या ही त्याच्या मागे मागे जाते . आई किचन मध्येचं होत्या . ती त्यांचा आशीर्वाद घेते.  .
" आई कशा आहात तुम्ही ? "
" मी मजेत ,  तू कशी आहेस बेटा ? "
" मी पण मजेत "
" जावई कुठे गेला माझा ? "
" आहे ना समोर बसलेला " 
" बरं मी जाऊन गप्पा मारते त्याच्याशी तुम्ही आना आम्हाला गरमागरम चहा आणि सोबत भजी . "
" हो म्हणत नित्या रिप्लाय करते आणि नाजूक स हसत होती . 
राहुलची आई शेखर शी एकदम फ्रीली गप्पा मारते . "
त्यांची गप्पांची मैफिल कितीतरी वेळ रंगली होती .
विषयाला विषय खूप विषय निघत गेले . त्यांचे पूर्व जन्मी चे चं एक अनोखे बंध वाटतं होते . 

नित्या राहुलचं सार घर बघते . तोपर्यंत राहुल चहा ही तयार करून ठेवतो . ते दोघेही चहा घेऊन हॉल मध्ये येतात . त्यांच्या गप्पाच्या मैफिलीत सामील होतात .

इकडच्या तिकडच्या खूप गप्पा होतात.  सांजवेळी ते परत ब्रीज हॉटेल कडे जायला निघतात . जाताना राहुलची आई त्यांना एवढंच म्हणते , " उद्या जोडीने आमच्याकडे जेवायला यायचं . "
" हो नाही करायच नाही " 
माझी ऑर्डर आहे . आई ह्या नात्याने दिलेली . "

काय वाटत उद्या परत येईल का ? शेखर आणि नित्या राहुलच्या घरी बघुया पुढच्या भागात ...

तो पर्यंत वाचत रहा प्रेम बंधन ... 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...