का जात नाही मनातील खंत ...
दिवसामागून दिवस जातात ,
स्वप्न माझी सांजवेळी प्रमाणे बदलतात ...
रोपट्याचे वट वृक्ष होते ,
फुलांचे सुगंध दरवळते ...
मी उंच झेप घेण्याचे वेडे स्वप्न बघते ....
ध्येयवादी मनात माझ्या ,
हजारो स्वप्न रुजतात ,
आशा आकांक्षा येऊन त्याची गाठभेट घेतात ..
कदचित असेल मी भाग्यवंत ,
खूप रचना मला सुचतात ...
माझे अस्तित्वाच्या प्रतिबिंबात त्या सजतात ....
स्वप्न मला नवे दाखवतात ...
व्वा् ताई फारच सुंदर
ReplyDelete