नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 1, 2021

फिलिंग

भावनांना आवर घातला येत नाही ,
फिलिंग कोणाबद्दल काय आणि कशी येईल ,
ह्याचा काही नेमच नाही ...

आपण सर्व गोष्टींवर balance ठेवू शकतो , पण मनावर balance ठेवणे शक्य नाही . त्यामुळे आलेली प्रत्येक फिलिंग भरभरून जगून घ्यायची . खूप एन्जॉय करायचं .
प्रत्येक क्षण प्रत्येक फिलींगचा आनंद घ्यायचा . पुढे काय होईल याचा विचार जरा बाजूला ठेवायचा .

हा पण खूप गुंतायच नाही . कोणातच ना प्रियकरावर ना कोण्या मित्रावर प्रेम करा . असं मी सांगत नाही . कारण ना प्रेम ही फिलिंगच मला आवडत नाही . कारण प्रेम ही फिलिंग नसून खूप मोठी यातना आहे . ती शेवटपर्यंत त्रासदायक ठरते . 

प्रेमात पडा तो किंवा ती माझाच किंवा माझीच व्हायला हवी. हा विचार बाजूला ठेवून . कारण जिथे हट्ट आणि अधिकार असतो तिथे स्वार्थ असतो . जो की एखादं चांगलं असलेलं नातं ही संपवू शकत . 

हा पण जेव्हा केव्हा खूप स्पेशल फिलिंग येईल तेव्हा त्या फिलींगचा भरभरून आनंद घ्या .

चुकीस क्षमस्व : 
मी पण काहीही लिहीत असते . जे सुचेल ते कोणी मनावर घेऊ नये . 
पण फिलिंग मात्र भरभरून जगून घ्या .




1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...