नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ,
साऱ्याच चांदण्याची ह्या जगतास जाणं नाही ...
कवि कुसुमग्रजांची अप्रतिम काव्यरचना मनाला भावणारी माझी आवडती ...
खरच नात्याला काही नावं देण्याची गरज असते का ? मला तरी नाही वाटत . साऱ्याच चांदण्याना आपलं गणल आहे का ? नाही ना मग का सर्वच नात्याला नाव असायला हवा असा हट्टहास , हा हट्ट हास धरण योग्य आहे का ? नाही बिलकुल नाही .
एखाद्याशी कनेक्शन असणं महत्त्वाचं आहे . तिथे तुमचं त्याच्याशी काय नातं आहे . ह्याला महत्व नाही . तुम्ही त्या व्यक्तीचा किती आधार करता , त्याचा तुम्हाला किती लळा आहे . तुमच्या नात्यात किती ओढ आहे . ह्याला सर्वात जास्त महत्व असतं .
स्कूल मध्ये असताना अनेकदा म्हटल जायचं , निसर्ग आणि मानव ह्याच युगान युगांपासून खूप जवळचं नातं आहे. पण नक्की काय नातं आहे . हे कोणीही नाही सांगितल आणि आम्ही ही कधी नाही विचारलं . पशु पक्षी प्राणी वनस्पती हे सारेच आपल्या जवळचे मित्र आहेत . पण ह्या मैत्रीला योग्य ते नावं काय आहे . हे अजुनही लक्षात नाही येत . आणि मला आणायचं पण नाही आहे .
ते नातं खूप खास आहे . त्या नात्याला नावं असायलाच हवं हा माझा हट्ट हास नाही काही .
असच असतं अनेक नाती खूप छान असतात . पण त्या नात्याला योग्य ते नावं आणि ओळख न मिळाल्यामुळे ती नाती अनेकदा तुटतात . पण ती न तुटू न देता . जशी आहे तशीच जपायला हवी . गरज नाही ओ तुमच्या नात्याला काय नावं आहे . हे जगाला सांगत बसण्याची . जग येणार नाही तुमच्या नात्याला नवीन नावं द्यायला .
तुमचं नातं आहे तसचं त्याला जपा . त्या नात्याला आणखी बहर येण्यासाठी प्रयत्नशील रहा . जग नावं ठेवेन , आपल्या चरित्रावर बोटं दाखवेन ह्या भीतीने कोणत्याही नात्यांचं ending करू नका .
जसं आहे तसं त्याला शेवटच्या श्वासापर्यंत जपा ....
All the best तुमची सारी गोड गोड नाती जपण्यासाठी
आणि हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
खूपच सुंदर अप्रतिम बरोबर आहे नात्याला काही नाव नासावे
ReplyDeleteअतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👍
ReplyDelete