नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 2, 2021

नात्याला नावं देण्याची गरज नाही ....

नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ,
साऱ्याच चांदण्याची ह्या जगतास जाणं नाही ...

कवि कुसुमग्रजांची अप्रतिम काव्यरचना मनाला भावणारी माझी आवडती ...

खरच नात्याला काही नावं देण्याची गरज असते का ? मला तरी नाही वाटत .  साऱ्याच चांदण्याना आपलं गणल आहे का ?  नाही ना मग का सर्वच नात्याला नाव असायला हवा असा हट्टहास  , हा हट्ट हास धरण  योग्य आहे का ? नाही बिलकुल नाही .

एखाद्याशी कनेक्शन असणं महत्त्वाचं आहे . तिथे तुमचं त्याच्याशी काय नातं आहे . ह्याला महत्व नाही . तुम्ही त्या व्यक्तीचा किती आधार करता , त्याचा तुम्हाला किती लळा आहे . तुमच्या नात्यात किती ओढ आहे . ह्याला सर्वात जास्त महत्व असतं .

स्कूल मध्ये असताना अनेकदा म्हटल जायचं , निसर्ग आणि मानव ह्याच युगान युगांपासून खूप जवळचं नातं आहे.  पण नक्की काय नातं आहे . हे कोणीही नाही सांगितल आणि  आम्ही ही कधी नाही विचारलं . पशु पक्षी प्राणी वनस्पती हे सारेच आपल्या जवळचे मित्र आहेत . पण ह्या मैत्रीला योग्य ते नावं काय आहे . हे अजुनही लक्षात नाही येत . आणि मला आणायचं पण नाही आहे .
ते नातं खूप खास आहे . त्या नात्याला  नावं असायलाच हवं हा माझा हट्ट हास नाही काही .

असच असतं अनेक नाती खूप छान असतात . पण त्या नात्याला योग्य ते नावं आणि ओळख न मिळाल्यामुळे ती नाती अनेकदा तुटतात . पण ती न तुटू न देता . जशी आहे तशीच जपायला हवी . गरज नाही ओ तुमच्या नात्याला काय नावं आहे . हे जगाला सांगत बसण्याची . जग येणार नाही तुमच्या नात्याला नवीन नावं द्यायला .

तुमचं नातं आहे तसचं त्याला जपा . त्या नात्याला आणखी बहर येण्यासाठी प्रयत्नशील रहा . जग नावं ठेवेन , आपल्या चरित्रावर बोटं दाखवेन ह्या भीतीने कोणत्याही नात्यांचं ending करू नका .
जसं आहे तसं त्याला शेवटच्या श्वासापर्यंत जपा ....

All the best तुमची सारी गोड गोड नाती जपण्यासाठी
आणि हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

2 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम बरोबर आहे नात्याला काही नाव नासावे

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👍

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...