समजून घेण्यास अशक्त झाले ..
किती समजून घ्यावं ,
कितीदा रुसलेल्याला मनवावं ...
विचीत्र वागणं कस काय झेलाव ,
अल्लड वागण्याला काय बरं नाव द्यावं ..
नातं कोणतं ठाऊक नाही ,
नात्याला त्या स्टेशन ही नाही ...
आणि बसस्टॉप ही नाही ..
आहे मात्र झकास ,
तरीही वाट्याला का हा वनवास ...
कधी मिळेल पुन्हा त्याचा सहवास ..
नव्याने कधी होईल पुन्हा एकदा सुरू हा प्रवास ...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteSunderch 👌👌👌
ReplyDelete