नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 11, 2021

प्रेम बंधन भाग ५

ज्या दिवशी शशी आणि नित्याचा कॉल होतो , त्याचं दिवशी राहुल एक पोस्ट शेअर करतो . 
 " सॉरी कामाच्या व्यापामुळे मला इथे वेळ द्यायला जमत नाही . तुम्ही खूप प्रेम दिलं , आपुलकीचं एक सुंदर नातं निर्माण केलं . सांगायला अत्यंत दुःख होत आहे , आपला प्रवास इथपर्यंत चं होता ." 👏👏👏🙏🙏🙏

नित्या ही पोस्ट वाचते तिला खूप वाईट वाटतं . ती लगेच राहुलच्या इनबॉक्सला एक मेसेज टाकते . 
" आता आपली मैत्री पण संपली का ? " 
दोन तीन दिवस उलटून जातात , तरी ही मेसेजला काही रिप्लाय आला नव्हता . त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यांत नकळत पाणी यायचं . जर मैत्री चा शेवट करायचा होता , तर मग मैत्री च का केली होती . असं म्हणत ती स्वतःच दुःख रचनेत तर कधी देवासमोर व्यक्त करत होती. ती देवाला मनापासून प्राथर्ना करत होती . 
" देवा प्लीज , प्लीज राहुल अकाऊंट वर परत येऊ दे , आमची मैत्री नव्याने बहरू दे . " 
 
असे करत करत 4 - 5 दिवस जातात . मग ती शशी ला मेसेज टाकते . 
" राहुलने अकाऊंट का बंद केलं " 
ऑनलाईन असल्यामुळे शशी लगेच मेसेज ला रिप्लाय देतो . 
" अगं मला तर आताच तुझ्याकडून कळतय त्याने अकाऊंट बंद केलं ; पण तुला कसं कळलं त्याने अकाऊंट बंद केलं ? " 
" अरे तू त्याची पोस्ट नाही का वाचली ? " 
" अगं पण ती पोस्ट आहे ना ?" 
" पोस्ट अशी कशीही असते का ? "
" अगं मजाक करत असेल तो , येईल तो परत असं नाही करणार तो . " 
" ते काहीही असो पण तू त्याला प्लीज समजावं आणि तो कुठे आहे . ते पण विचार . " 
" ओके 1 मिनिट कॉल करतो . " 
शशी लगेच राहुल ला कॉल करतो आणि विचारतो . " . "कुठे आहेस मित्रा अकाऊंट वरुन गायब का ?"
"मी सध्या बँगलोर आहे . "
रेंज प्रोब्लेम मुळे एवढंच बोलण होतं . शशी लगेच नित्याला मेसेज टाकतो . 
" अगं तो बँगलोर ला आहे . रेंज प्रोब्लेम आहे . येईल तो परत डोन्ट वरी . बी हॅपी " 
😊😊😊😊
" थॅन्क्स शशी " 
" ओके बाय " 

रेंज प्रोब्लेम त्यामुळेच काधाच चीत त्याने आपल्याला मेसेज ला रिप्लाय नसेल दिला . असं म्हणत ती शांत झोपी जाते . लवकर झोपल्या मुळे तिला 3 साडे तीन च्या दरम्यान जागं आली . खूप झोपण्याचा प्रयत्न केला.
पण झोप काही येईना . मग तिने अकाऊंट ओपन केलं . तर लगेच राहुल च नोटिफिकेशन् आलं . तिच्या मेसेज ला रिप्लाय . 
" ह्या जन्मात तरी नाही संपणार आपली मैत्री " 
😊😊😊
तिने लगेच रिटर्न रिप्लाय दिला .
" थॅन्क्स वेलकम बॅक " 💐💐💐🍫🍫🍫🍫
राहुल जागीच असावा त्याने पण thanks म्हणून रिप्लाय केला .
नित्या. " तू अजुन जागीच ." 
 राहुल " तू पण आहेच की " 
नित्या " झोप येत नव्हती त्यामुळे . " 
राहुल - " मी फक्त अर्धा तास झोपतो . " 
नित्या - " एवढं कमी " 
राहुल - " कमी कुठे " 
नित्या - " ओके छान कुठे गायब झाला होता स ? आणि ती पोस्ट अशी का ? " 
राहुल - " ती फक्त पोस्ट होती ना . " 
नित्या - " किती आकडु आहेस तू , खडूस स्स ." 
राहुल - 😂😂😂🤣🤣🤣
नित्या - " आता हसायला काय झालं " 
राहुल - " असच आलं हसू " 
नित्या - " असच कसं कारण नसताना . " 
राहुल - " जाऊ दे ते , कशी आहेस तू ? " 
नित्या - " तू कसा आहेस ? " 
राहुल - " एकदम झकास " 
नित्या - " नेहमी तसाच रहा ."
राहुल - " येस मॅम " 
नित्या - " चल आता झोपते मी बाय good night sweet dreams see you again " 😊😊😊
ती झोपी जाते . 
तो पण " ओके " म्हणून झोपी जातो.  खूप दिवसांनी त्याच्याशी बोलून तिला खूप बर वाटतं . त्याला पण.
 एक वेगळीच ओढ एकमेकांना एकमेकांची वाटू लागली.
जसे वेलीचे फुल असले , तरी त्याचे कुठेतरी वेगळे अस्तित्व असते . तसचं त्याच्या नात्याच होत . मैत्रीच्या नावाने ते वेगळ्याच धाग्यात गुंफू लागलं होतं . त्याच नेमक अस्तित्व काय दोघांनाही ठाउक नव्हतं .  रोज
न चुकता एकमेकांशी बोलणं एवढंच काय ते एकमेकांना माहीत होतं . " 
आता त्याच्या नात्याची वेल  खूप म्हणजे खूपच सुंदर बहरली होती . श्रावणात जशी वृक्षाला नवत फुटते .
तशीच नवती त्याच्या नात्याला फुटत होती . ती त्यांच्यात होणाऱ्या भांडणाने . निर्माण झालेल्या दुरावा आणि अबोल्याने . ते एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागले होते.
नाते ऑनलाईन असले तरी , खूप जुने जिव्हाळ्याचे ऋणानुबंध ते वाटतं होते . एकमेकांसाठी रचना लिहीन त्यांना आवडू लागल होतं . एकमेकांसाठी मनात कुठेतरी वेगळचं गुपित लपलं होतं . 
आता तिला ओढ लागली होती त्याचा आवाज ऐकण्याची पण मोबाईल नंबर मागावा तर , कसा मागावा ? " 
आपण मुलगी आहोत . समोरून  मागणं  तिला चांगलं वाटत नव्हतं . " त्याने न मागताच द्यावं असं मनोमन वाटत होत . त्या उद्देशाने ती एक मेसेज राहुल ला टाकते.
" राहुल मला तुझ्याकडून एक गोष्ट हवीय . पण मी न मागताच तू मला द्यावी . ही माझी इच्छा आहे . प्लीज देशील ना . " 

ह्या मेसेज चा रिप्लाय बघुया आपण पुढील भागात ...

मागील पूर्ण कथा वाचण्यासाठी ब्लॉगर वर मागील पृष्ट ह्या ठिकाणी क्लिक करून वाचू शकता ...

थँक्यू सो मच ... 🙏🙏🙏
 








No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...