" तुला जे हवं , ते मी नक्की देईन . पण तू सांग ना डायरेक्ट काय हवं ते . "
नित्या - " मुलीने मागणं चांगलं नाही वाटत ते प्लीज तू समजुन घे ना ."
राहुल - " हो पण काय ? सांगशील तर कळणार ना . "
नित्या - " तुझ्या कुशाग्र बुद्धी ला सार कळतं . मग हेही कळेल जरा डोकं चालव . "
राहुल - " बरं - बरं उद्या देतो , मित्राला विचारून देतो . "
नित्या - " नको आपल्यात मित्र कशाला ? राहू देत नको देऊ नको मला . "
राहुल - " बरं काय नको ते तर सांग ? "
नित्या - " नंबर हवा होता तुझा . देशील का ? "
राहुल - " नंबर कशाला ? आपण इथे आहोत ना कनेक्ट"
नित्या - " हो पण दे ना . मी काही तुला दररोज कॉल नाही करणार infact करणारच नाही . "
राहुल - " मग कशाला हवा . नको नंबर नको . "
नित्या - " पण का ? दे ना "
राहुल - " नाही म्हंटल तर नाही . असा त्रास देणं बर वाटतं का तुला नको देऊ असा त्रास . "
नित्या - " पण दे ना , एवढा काय भाव खातोस . "
राहुल - " मी फक्त पाव खातो भाव नाही . "
नित्या ,- " तू ना खूप आकडु आहेस . "
राहुल - " हो ग माहितेय ना " 😂😂😂🤣🤣🤣
नित्या - " राहुल दे ना "
राहुल - " बरं देतो wp देतो . त्यावर कॉल लागणार नाही.
फक्त wp चॅटिंग ."
नित्या - " हो चालेल ."
राहुल - 9854321576
नित्या - " thanks थांब आता लगेच wp करते ."
राहुल - " आता नको नंतर कधीतरी ."
नित्या - " का ?"
राहुल - " नको आता दिला ना . नंतर कर कधीतरी ."
नित्या - " नाही आत्ताच . "
राहुल - " तो नंबर माझा नाही . आमच्या गल्लीतील एका पांचट मुलाचा आहे . जो मुलींच्या सतत मागे लागतो ."
नित्या - " असं का रे ? असं कोणी कोणाचा पण नंबर देत का ? किती खडूस आहे तू . "
राहुल - " सॉरी सॉरी "
नित्या - " इट्स ओके मी पण नव्हता घेतला तो लिहून मला माहित होत . तू असच काहीतरी पांचट पणा करणार ."😂😂😂😂🤣🤣🤣
राहुल - " हो का ? तशी हुशार आहेस तू . "
नित्या - "मी नाही हुशार तू आहेस . बरं झालं हा प्रकार माझ्याबरोबर केला . प्लीज अस दुसऱ्या बरोबर करू नको . वाईट वाटतं मुलींना मी समजून घेतलं . बाकी कोणीही कधीच समजून नाही घेणार ."
राहुल - " हो आता असं चुकून पण नाही करणार . "
नित्या - " good चल आता झोपते मी good night "
बोलू परत शक्य झालं तर ."
राहुल - " म्हणजे काय बोलावं च लागेल . हे बघ मी तुला कितीही त्रास दिला . तुला कितीही छळलं तरी तुला माझ्या प्रत्येक मेसेज रिप्लाय हसून चं द्यावं लागेल ."😂😂🤣🤣
नित्या - " हो चालेल बाय काळजी घे ."
नीत्याला त्याचा खूप राग आला होता . पण तिने त्याला तो राग जराही दाखवला नव्हता . त्यालाही तिचं ते प्रेमळ आणि शांत वागणं खुपचं आवडल होत . ही मुलगी इतरांपेक्षा काहीतरी वेगळीच आहे . पण छान आहे .
त्यांचं बोलणं हे सुरूच असतं .
राहुल ने नित्याचा फोटो पाहिलेला नव्हता . त्याच्या मनात होत. तिने तिचा pic एकदा तरी dipivr ठेवायला हवा . पण तसं तो बोलू शकणार नव्हता . पण नित्याला ही वाटतं होतं , राहुल ने आपला पीक बघावा .
म्हणून ती एके दिवशी खूप सुंदर रेडी होते . यलो कलरची साडी . कानात कानाला शोभेल असेल मिडीयम कानातले डुल . गळ्यात सिंपल चैन , एका हातात वॉच एका हातात बांगड्या . राहणीमान एकदम स्टॅंडर्ड . बघताच क्षणी तिच्यावर कोणीही भाळेल एवढी सुंदर ती दिसत होती .
तिने dipivr तिचा pic ज्या दिवशी ठेवला . त्या दिवशी राहुल दिवसभर ऑनलाईन आलाच नव्हता . Dipi बघून तिचे त्या दिवशी खूप fallowers वाढले होते . आणि इनबॉक्सला पण खूप मेसेज आले होते . मेसेज बघून तिला एक क्षण वाटलं . Dipi बदलावा . पण ज्याच्यासाठी ठेवला त्यानेच अजुन बघितला नव्हता म्हणून तिने त्या दिवशी राहू दिला . रात्री झोपताना तिने राहुलला एवढाच मेसेज टाकला राहुल तू माझा dipi पाहिलास का ? "
खूप वेळ झाला तरी रिप्लाय आला नव्हता शेवटी रिप्लाय ची वाट बघून बघून ती तशीच मोबाईल आपल्या उशाखाली ठेवून झोपी जाते .
सकाळ सकाळी 5 साडे पाच वाजता उठते. पक्षांचा किलबिलाट कोकिळेचा कुऊ कूऊ आवाज , भोवताली दरवळनारा मोगऱ्याचा सुगंध त्या अशा मनमोहक वातावरणात तिचा मेसेजला रिप्लाय आला की नाही . हे बघण्यासाठी चाललेला तरपडा . ती उठते केस तसेच मोकळे सोडलेले , एका हाताने बेडवर पडलेली ओढणी सावरत ती झोपल्याकडे धाव घेते . राहुलचा मेसेज ला आलेला रिप्लाय पाहून खूपच खूष होते . ते रिप्लाय बघून तिला सहज एक रचना सुचते ती लगेच tyipe करते
आखो में एक सपना है ।
सपनों में मेरे दिल का राजा है ।।
उसे पाने की धीरे धीरे कर रही हूं कोशिश ।
रब जाने कहा जुड़ी है ।।
मेरे किस्मत की लकीर ।
ये भगवान जिसे चाहती हूं ।।
उसे हमेशा खुश रखना ।
मेरी खुशी भी उसे देना ।।
उसका दर्द हमेशा मेरे लिए बचाके रखना ।।
ये अल्ला मिला दे उसे ।।
जिसे मै चाहती हूं दिल से ।।
नक्की राहुल ने असा काय रिप्लाय दिला होता . की नित्या रिप्लाय वाचून एवढी सुंदर रचना करते .
ते बघुया पुढच्या भागात ..
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ट ह्या ठिकाणी क्लिक करा .
No comments:
Post a Comment
Comments plz.